गजानन गव्हाणे पाटील
पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ) ची सर्वसाधारण सभा नुकतीच भारतीय जैन संघटना वाघोली येथे संपन्न झाली सदर सभेमध्ये २०२५-२८ साठी त्रैवार्षिक नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे सचिव केरुभाऊ ढोमसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा अध्यक्ष पदी वढू (ता.शिरूर) येथील श्री शरदचंद्र माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक सोमनाथ भंडारे यांची अध्यक्षपदी तर तानाजी झेंडे यांची सचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

सादर निवडीसाठी निरीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष गोरक्षनाथ थोरात, पुणे विभाग शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव कामथे यांनी काम पाहिले.

या सभेसाठी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे मावळते अध्यक्ष वसंतराव ताकवले, पुणे जिल्हा टी.डी.एफ.चे मुरलीधर मांजरे,महिला संघाच्या अध्यक्ष सौ स्वाती उपार, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सभासद अनिल साकोरे हे मान्यवर उपस्थित होते.

पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) ची नूतन कार्यकारिणी खालील प्रमाणे-
अध्यक्ष-सोमनाथ भंडारे (शिरूर),सचिव – तानाजी झेंडे -(पुरंदर) ,कार्याध्यक्ष-किशोर दरेकर,राज्य प्रतिनिधी- मुरलीधर मांजरे(खेड)प्रदीप गाढवे( जुन्नर),रामचंद्र नातू (दौड)उपाध्यक्ष- सुनील ताकवणे(दौंड),सुनील आदलिंग(इंदापूर),अंकुश कुडपणे,रमेश ढोमसे( जुन्नर),कोषाध्यक्ष-सुनील वीर(भोर),आय व्यय निरीक्षक-मुकुंद भिसे,वार्तापत्र संपादक-राजेंद्र बोधे(हवेली)प्रसिद्धी प्रमुख प्रवक्ता-मिननाथ पानसरे (जुन्नर),सहकार्यवाह-एकनाथ टोपे(खेड),मनोहर खुणे (मावळ),अविनाश दराडे (आंबेगाव), सहकोशाध्यक्ष-विजय मोहिते (वेल्हे), गणेश मांढरे(शिरूर) सह आय व्यय निरीक्षक-विश्वनाथ दामगुडे(भोर),रावसाहेब वाघ(मुळशी), सह वार्तापत्र संपादक- संजय भिंताडे





