- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणस्नेहल हिरे ची सनदी लेखापाल पदाला गवसणी

स्नेहल हिरे ची सनदी लेखापाल पदाला गवसणी

- Advertisement -spot_img

सणसवाडी च्या शिरपेचात मानाचा तुरा
गजानन गव्हाणे पाटील
सणसवाडी ता.शिरूर येथील स्नेहल अरुण हिरे या तरुणीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या जिद्दीच्या जोरावर सनदी लेखापाल परीक्षेत उत्तीर्ण होत सणसवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.


सर्व सामान्य कुटुंबातील स्नेहल हीचे माध्यमिक शिक्षण सणसवाडी येथे, उच्च माध्यमिक शिक्षण कर्वेनगर येथे तर पदवी व पदव्युत्तर शिक्षण सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे झाले. खासगी ऑनलाइन क्लासेस आणि स्वयं अध्ययनाच्या जोरावर स्नेहल ने खडतर परिश्रम घेत यश मिळविल्याने तिचे सणसवाडी परिसरातून कौतुक होत आहे.

लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या स्नेहलचे सीए होण्याचे ध्येय होते. खडतर परिश्रमाने तिने ते साध्य करत आपल्या आई वडिलांसह सणसवाडी गावचे नाव रोशन केले. स्नेहलचे वडील अरुण हिरे हे सध्या सणसवाडी येथे खाजगी कंपनीमध्ये अधिकारी असून, आई सौ मनिषा या गृहिणी आहेत. स्नेहल ने सनदी लेखापाल (सी ए ) परीक्षेत यश मिळविल्याचे समजताच आई वडिलांना आनंदाश्रू अनावर झाले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page