गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा येथील सामाजिक कार्यकर्ते, ग्रंथालय क्षेत्रामध्ये गेली ४० वर्ष कार्यरत असणारे फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष आणि संचालक शंकर ज्ञानोबा गव्हाणे यांची नुकतीच सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष श्री सदाशिव बेडगे यांनी केली.

श्री. गव्हाणे हे गेली ४० वर्ष ग्रंथालय क्षेत्रामध्ये कार्यरत असून पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे १५ वर्ष संचालक , आणि १२ वर्ष ग्रंथपालन प्रशिक्षण वर्ग पुणे चे वर्ग व्यवस्थापक आणि शिक्षक म्हणून उल्लेखनीय कार्य केलेले आहे.

पुणे जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक ग्रंथालयांना त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. ग्रंथालय चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सिंबायोसिस या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये ३३ वर्ष सेवा करून ते जून २०२४ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत.
भविष्यकाळात सार्वजनिक ग्रंथालयांना मार्गदर्शन आणि ग्रंथालय चळवळीत भरीव कार्य करण्याचा मनोदय त्यांनी निवडीनंतर झालेल्या सत्कारास उत्तर देताना त्यांनी व्यक्त केला.





