गजानन गव्हाणे पाटील
पेरणे फाटा, ता.हवेली येथील एक जानेवारी रोजी होणाऱ्या जयस्तंभ शौर्यदिनी भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे तेलचित्र त्याच बरोबर अशोक चक्र असलेला निळा ध्वज आणि जय भीम घोषवाक्य अशी सजावट भीम सैनिकांच्या संकल्पनेतून करण्यात येणार असून या वर्षी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.

याकरिता बार्टी संचालक, निबंधक तसेच जिल्हाधिकारी यांची शासन मान्यता घेण्यात आली आहे. यंदाच्या शौर्यदिनी भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तैलचित्र त्याच बरोबर जय भीम घोषवाक्य आणि निळा ध्वज असा अनोखा संगम स्तंभावर दिसणार आहे. यंदा विजयस्तंभ ची सजावट भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षाचे औवचित्या साधून करण्यात आली असल्याचे कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा समिती अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, युवराज बनसोडे, विवेक बनसोडे यांच्या वतीने सांगण्यात आले.





