गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आयोजित श्री दत्त जयंती निमित्त श्री गुरुचरित्र पारायण व अखंड प्रहर नाम जप यज्ञ सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी कोरेगाव भीमा व पंचक्रोशीतील वढू बुद्रुक, वढू खुर्द, पेरणे, वाडा पुनर्वसन, आपटी तसेच इतर भागातून शेकडो स्वामी समर्थ सेवेकरी यामध्ये सहभागी झाले होते.

यावेळी ग्रामदेवता सन्मान, मंडळ मांडणी, मंडळ स्थापना, अग्नी स्थापना, हवन, नित्य स्वाहाकार गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, स्वामी याग, चंडीयाग, रुद्रयाग, मल्हारी याग, बली पूर्णाहुती तसेच दत्तजन्मोस्तव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच कोरेगाव भीमा येथील प्रदक्षिणा मार्गावरून श्री स्वामी समर्थ महाराजांची मोठ्या उत्साहात पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शेकडोंच्या संख्येने सेवेकरी उपस्थित होते. यामध्ये महिला व लहान मुलांची संख्या लक्षणीय होती

मागील बारा वर्षांपासून कोरेगाव भिमा येथे स्वामी समर्थांची सेवा करण्यात येते तसेच गुरू चरित्र पारायण सोहळा देखील या ठिकाणी सुरू करण्यात आला. या सप्ताहामध्ये २४ तास अखंड सेवा प्रहर सेवा चालू होती. सेवा केंद्रामध्ये अनेक लोकांना प्रचंड अनुभूती व प्रचिती आलेले आहे मनुष्य जन्माचा सार्थक करणारा असा हा भव्य दिव्य सोहळा पार पाडला.


गुरुचरित्र पारायण सोहळ्यामध्ये ५५३ सेविकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामधील महिलांची संख्या लक्षणीय होती तसेच तसेच सामूहिक सांगता वेळी महाप्रसादाला देखील भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.





