- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणसंगीता नवनाथ हरगुडे यांची उद्योगनगरी सणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड

संगीता नवनाथ हरगुडे यांची उद्योगनगरी सणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड

- Advertisement -spot_img

प्रतिनिधी : गजानन गव्हाणे पाटील

             ” उद्योगनगरी ग्रामपंचायत सणसवाडी, ता. शिरूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व वारकरी संप्रदायाच्या विचारांची पाईक असणाऱ्या कष्टाळू कुटुंबातील संगीता नवनाथ हरगुडे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाल्याने सणसवाडी येथील नागरिकांनी जल्लोषात मिरवणूक काढली “
उद्योगनगरी सणसवाडी येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा राजीनामा स्नेहल भुजबळ यांनी दिल्याने दि. २९ एप्रिल रोजी सरपंच पदाची निवडणूक पार पडली. यावेळी सरपंच पदासाठी संगीता नवनाथ हरगुडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली असल्याची घोषणा करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विकास फूके यांनी काम पाहिले तर या कामी ग्रामसेवक बाळनाथ पवणे व पोलीस कॉन्स्टेबल करपे यांनी सहकार्य केले.
माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्याचा प्रयत्न केला तर माजी सरपंच स्नेहल भुजबळ यांच्या कार्यकाळात राज्यात आदर्श ग्रामपंचायत पुरस्काराने ग्रामपंचायतीच्या विकासकामांची दखल राज्यपातळीवर घेतली गेली. यामुळे सणसवाडी येथील दोन्ही महिला सरपंचांनी विकासाच्या बाबतीत महत्वपूर्ण कमगीरी करत आपल्या विकासकामांचा शिक्कामोर्तब राज्यस्तरावरील पुरस्कारांवर नाव कोरत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
सणसवाडी येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य गावच्या विकासासाठी प्रयत्न करत असून चांगल्या विचारांच्या व विकासाच्या बाबतीत एकरूप असून आमदार अशोक पवार व सुजाता पवार यांच्या विचारांवर काम करत आहे असे मत पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर यांनी व्यक्त केले. सणसवाडी गावचे नाव राज्याच्या नकाशात नेण्याचे महत्वपूर्ण काम स्नेहल भुजबळ यांनी केले. गावचे प्रतिनिधी सर्वजण उत्तम कारभार करत आहेत. पायाभूत सुविधा गावच्या विकासात महत्त्वाच्या असतात त्यासाठी काम करायला हवे असे मत माजी सरपंच व माजी संचालक दत्तात्रय हरगुडे यांनी व्यक्त केले
” सणसवाडी येथील सरपंच व उपसरपंच शब्दाला जागत वेळेत राजीनामा देऊन सर्वांना संधी देण्याचा एक आदर्श घालून देत माजी सरपंच सुनंदा दरेकर यांनी वेळेवर राजीनामा दिल्याने ग्रामस्थांनी माजी सरपंच यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला आहे.

यावेळी नवनिर्वाचित सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, माजी सरपंच स्नेहल भुजबळ, सुनंदा दरेकर, उपसरपंच सागर दरेकर, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, बाजर समितीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, युवराज दरेकर, अनिल दरेकर, सुहाज दरेकर, जयसिंग दरेकर, मनसे नेते रामदास दरेकर, माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य शशिकला सातपुते, सुवर्णा रामदास दरेकर, रुपाली दरेकर, राजेंद्र दरेकर, दिपाली हरगुडे, रामदास दरेकर, ललिता दरेकर, राहुल हरगुडे, दत्तात्रय हरगुडे, अक्षय कानडे, काँग्रेसचे शिरूर तालुका अध्यक्ष वैभव यादव, सोसायटीचे चेअरमन सुरेश हरगुडे, ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवणे होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page