गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा ता. शिरूर येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी च्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वर्षभर श्री खंडोबा देवस्थान या ठिकाणी मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. चंपाषष्ठी निमित्त आयोजित कार्यक्रमाला खंडोबा भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी असे आवाहन जय मल्हार सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

या निमित्त ०२ डिसेंबरला देवाच्या घटाची स्थापना करण्यात आली. तसेच चंपाषष्ठी रोजी सायंकाळी तेलवनाच्या कार्यक्रमा निमित्त खंडोबा रायाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. तर पोपट अशोक चव्हाण यांच्या जागरणाचा कार्यक्रम घेण्यात आलां. येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याचा हजारो भक्तांनी लाभ घेतला तसेच चंपाषष्ठी चे औचित्य साधत मल्हार मार्तंड ग्रंथाचे पारायण ही संपन्न झाले.
कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन न जय मल्हार सेवा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले.





