गजानन गव्हाणे पाटील
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ वाघोली मध्ये भव्य पदयात्रा पार पडली.
या पदयात्रेला वाघोलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. या पदयात्रेमध्ये विशेषतः महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली. वाघोली मध्ये मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांना नक्कीच धडकी भरेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

अशोक पवार यांच्या माध्यमातून वाघोली परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली आहे. या विकास कामांची पोहोच पावती म्हणूनच ही आजची गर्दी झाल्याचे बोलले जात आहे.





