लोणी काळभोर : प्रतिनीधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ लोणी काळभोर येथील खोकलाई चौकात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. यावेळी सकाळची वेळ असतानाही नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही जेव्हा निधी मागतो तेव्हा आमच्यासमोर काट मारली जाते. आम्ही निष्ठावान आहोत, आम्ही खरं बोलतॊ. निष्ठावान असणं हा गुन्हा असेल तर तो मान्य आहे.
मी अशोक पवार व अमोल कोल्हे खासदार आमच्या तिघांची इमानदारी ही ताकद आहे. मी मात्र विरोधकांना संपवण्याची भाषा करणार नाही. मी अशोक पवार यांना विकासासाठी मत मागत आहे.

यावेळी बोलताना उमेदवार अशोक पवार म्हणाले, की हवेली तालुक्यातील परिसरात वाहतूक समस्या वाढत आहे. यासाठी गडकरी साहेबांच्याकडे भैरोबा नाला ते चौफुल्यापर्यंत पुलाची मागणी केली. ती मागणी मान्य केली. फ्लाय ओव्हरची तरतूद करून ती आपण मंजूर करून घेतोय. त्यामुळे वाहतुकीची समस्या सुटेल.
उपसभापती युगंधर काळभोर, जगनाथ शेवाळे, आप्पासाहेब काळभोर, माधव काळभोर, माजी सरपंच माधुरी काळभोर, शरद काळभोर, माजी सरपंच चंदर शेलार, नागेश काळभोर, विकास लवांडे, संदीप गोते, संदीप पवार, सुभाष टिळेकर उपस्थित होते.





