पुणे : प्रतिनीधी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव च्या निनादात दीपावली चे औचित्य साधत स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने वढू बुद्रुक, ता. शिरूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावर दीप प्रज्वलित करत दीपोत्सव साजरा करण्यात आला.


यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृषीराज टकले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या उपक्रमात राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ, अमृता पठारे, सीता जाधव, मंगल नागवडे आदी मान्यवर व स्वाभिमानी मराठा महासंघाचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. तसेच येथील माहेर संस्थेतील मुलांसाठी दिवाळी निमित्ताने खाऊचे वाटप करण्यात आले.





