गजानन गव्हाणे पाटील
महा विकास आघाडी चे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या महिला पदाधिकारी यांनी पुढाकार घेत अष्टविनायक थेऊर येथील चिंतामणी गणेश मंदिरात दर्शन घेत अशोक पवार यांच्या विजयासाठी साकडे घातले. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शरद पवार गटाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष शोभा हरगुडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

दीपावली चे औचित्य साधत चिंतामणी चरणी दर्शन घेत थेऊर गावात आणि परिसरातील नागरिकांना अशोक पवार यांनी केलेल्या कामाची माहिती दिली. तसेच या वेळी देखील महा विकास आघाडी चे उमेदवार अशोक पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन महा विकास आघाडी चे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी पुणे जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष शोभा हरगुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग काकडे, पुणे जिल्हा सरचिटणीस अर्चना सरोदे, व्यापार उद्योग व्यवसाय उपाध्यक्ष वैशाली बांगर, संगीता रोकडे तालुका सरचिटणीस कविता शेडगे, तालुका उपाध्यक्ष संध्या भोर आदी यावेळी उपस्थित होत्या.





