- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणप्रदीप कंद यांनी केला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

प्रदीप कंद यांनी केला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी १९८ शिरूर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांच्याकडे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसभापती रवींद्र कंद, क्रीडा आघाडीचे संदीप आप्पा भोंडवे, भाजपा शिरूर तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, यशवंत सहकारी कारखान्याचे चेअरमन सुभाष आप्पा जगताप, कामगार आघाडीचे जयेश शिंदे, माजी  उपसभापती रवींद्र कंद व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कंद यांनी उमेदवारी अर्ज भरला यामुळे शिरुर विधानसभा निवडणुक रंगतदार होणार आहे त्यामुळे शिरूर हवेली मतदार संघात चर्चेला उधाण आले आहे.


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असणारे प्रदीप कंद यांना या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी अशी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. परंतु जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला उमेदवारी जाहीर होताच अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे, परंतु शिरूर विधानसभेची उमेदवारी जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली, राष्ट्रवादीने आयात उमेदवाराला उमेदवारी दिला असून, त्यामुळेच भाजप कार्यकर्ते नाराज झाले. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढविण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे प्रदीप कंद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page