- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणशिरूर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर ऊर्फ...

शिरूर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर ऊर्फ कटके यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल…

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार व महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करीत ढोल ताशाच्या गजरात व गगनभेदी घोषणा देत आपला उमेदवारी अर्ज माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत भरला.
वाघोली येथे वाघेश्वराचे दर्शन घेऊन महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचें उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी शिरूर बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून भव्य रॅली काढली होती.
या रॅलीला मोठा उत्साह मतदार व सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दाखवला. शिरूर बाजार समिती आवारातून निघालेली रॅली शिरूर पाच कंदील चौक येथे जाहीर सभेमध्ये परिवर्तित झाली. याच वेळी मोजक्या कार्यकर्त्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी शिरूर तहसील कार्यालय येथे आपला उमेदवार अर्ज दाखल केला.


यावेळी गोडगंगाचे संचालक दादा पाटील फराटे, राहुल पाचर्णे, महेश ढमढरे, भगवान शेळके, रामभाऊ सासवडे, अरुण गिरे, नवनाथ काकडे, राजेंद्र जासूद, स्वप्निल गायकवाड, सुधीर फराटे आदी उपस्थीत होते. त्यामुळे शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत होईल असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page