गजानन गव्हाणे पाटील
ग्रामपंचायत कोरेगाव भिमा च्या वतीने दिवाळी निमित्त ग्रामपंचायत कर्मचारी यांना सालाबादप्रमाणे दिवाळी मिठाई वाटप करण्यात आली. तसेच कर्मचारी यांना माहे सप्टेंबर २०२४ व माहे ऑक्टोबर २०२४ चे वेतन व डबल बोनस म्हणून तब्बल २१ लाख रुपये कर्मचाऱ्यांना देण्यात आला.
यावेळी सरपंच संदीप ढेरंगे, माजी सरपंच विजय गव्हाणे, उपसरपंच सविता घावटे तसेच ग्रा. पं. सदस्य केशव फडतरे, मनीषा गव्हाणे, वंदना गव्हाणे, रेखा ढेरंगे, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत वाव्हळ होते. या प्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी यांना कपडे तर गावातील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर यांनाही दिवाळी निमित्त मिठाई वाटप करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली व ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.
ग्रामपंचायत कर्मचारी यांनी देखील मनोगत व्यक्त करताना ग्रामपंचायतीच्या या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करून आभार मानले. विद्यमान सरपंच संदीप ढेरंगे यांनी ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. ग्रामपंचायत ही कर्मचाऱ्यांच्या कामकाजा नुसार उत्कृष्ट रीत्या चालू असून कर्मचारी ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना सेवा पुरवण्यात बजावत असलेल्या कर्तव्याबद्दल कर्मचाऱ्यांचे देखील म्हणून आभार मानले.





