- Advertisement -spot_img
Homeक्राईमभोर मध्ये मशीन मध्ये पदर अडकल्याने महिलेचा मृत्यू

भोर मध्ये मशीन मध्ये पदर अडकल्याने महिलेचा मृत्यू

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ : प्रतिनीधी दीपक पारठे
भोर तालुक्यातील कुसगाव गोरेवस्ती येथे सोयाबीन भरडत असताना एका महिलेची साडी सोयाबीनच्या मशीनच्या एक्सल मध्ये गुंतल्याने मशीनने महिलेला ओढत घेत चिरडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि.२३) दुपारच्या सुमारास घडली. सदरची महिला सोयाबीन भरडताना अचानक मशीनमध्ये गेल्याने होत्याच नव्हत झाले. तरुण महिला मृत्यूमुखी पडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

राजगड पोलीस स्टेशन (शिंदेवाडी) यांनी दिलेल्या माहितीवरून रंजना दत्तात्रय गोरे (वय वर्षे ३५) रा. कुसगाव, गोरेवस्ती, ता. भोर जि. पुणे या घरासमोर सोयाबीन भरण्याकरिता गेल्या असता, सोयाबीन मशीन चालू झाल्यानंतर रंजना यांचा साडीचा पदर भरडी मशीनच्य एक्सलमध्ये गुंतला. यावेळी रंजना यांना भरडी मशीनमध्ये खेचले गेले असताना त्यांच्या शरीराला मोठमोठ्या गंभीर जखमा झाल्या होत्या. रंजना यांना मशीनमधून बाहेर काढून खेड शिवापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी महिला रंजना गोरे यांना मृत घोषित केले पुढील तपास राजगड पोलीस करीत आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page