गजानन गव्हाणे पाटील
सणसवाडी ता. शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिवाळीचे औचित्य साधत आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा वैशाली गावडे व अर्चना गरजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी येथील विद्यार्थ्यांनी आकर्षक पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवले असल्याची माहिती विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक सुरेश भंडारे यांनी दिली.

यावेळी जवळपास या उपक्रमात १८४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत पर्यावरण पूरक आकाश कंदील तयार केले. या उपक्रमाच्या मुळे विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद मिळावा. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा व ते बहरत जावेत, स्वतःच्या आनंदा बरोबरच पर्यावरण जपण्याची ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये यावी नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण प्रात्यक्षिकातून देणे आदी फायदा होत असल्याचे यावेळी आकाश कंदील निर्मितीचे संकल्पना मागील तीन वर्षांपासून राबवित असलेल्या वैशाली गावडे आणि अर्चना गरजे यांनी आपली लोकशाही शी बोलताना सांगितले.

तसेच यासाठी वंदना तांदळे, नेहा दराडे, काजल मुंडफण, वेदिका पोतदार यांनी मुलांना मार्गदर्शन करत त्यांचे कडून प्रत्यक्ष आकाश कंदील बनून घेतले. तसेच यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सणसवाडीचे प्रभारी मुख्याध्यापक सुरेश भंडारे, मार्गदर्शक शिक्षक सुधाकर मंचरकर, उज्ज्वला टेमगिरे, जयश्री दरवडे, ज्ञानदेव कुरंदळे, मनीषा गोसावी, राधिका पवार, जितेंद्र मातंग, गजानन वर्मा, यशवंत दिवेकर, पोपट इंगवले, सुरेश खैरे, विजय गोसावी, वैशाली खैरे या शिक्षकांचे सहकार्य लाभले.





