गजानन गव्हाणे पाटील
१९८ शिरूर विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार ॲड. अशोक रावसाहेब पवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे उमेदवार अशोक पवार मोठे शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता असून शिरूर शहरांमध्ये सभा होणार आहे. शिरूर बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून ते उमेदवारी अर्ज दाखल करतील.

१९८ शिरूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी आज पहिल्याच दिवशी पंढरीनाथ मल्हारी गोरडे यांचा आपला उमेदवारी अर्ज दाखल झाला तर आज पर्यंत २० उमेदवारांनी ५५ उमेदवारी अर्ज नेले असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी संगीता राजापुरकर व सहाय्यक निवडणुक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले.
शिरूरचे विद्यमान आमदार अशोक पवार, भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे चंदन सोंडेकर यांनी आज उमेदवारी अर्ज घेतला आहे.





