- Advertisement -spot_img
Homeक्राईमपेरणे येथे गुन्हे शाखा युनिट ६ ची अवैध दारू भट्ट्यांवर धडक कारवाई

पेरणे येथे गुन्हे शाखा युनिट ६ ची अवैध दारू भट्ट्यांवर धडक कारवाई

- Advertisement -spot_img

वाघोली : प्रतिनीधी
युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत अवैध धंदे प्रतिबंधक गस्त करीत असताना ऋषिकेश व्यवहारे व ऋषीकेश ताकवणे यांना माहिती मिळाली की, पेरणे ते डोंगरगाव रोडवर एक महिला भट्टी लावून दारू तयार करीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी टिमने अचानकपणे छापा घातला.

यावेळी शितल गणेश परदेशी (वय २३, रा. मोलाई चौक, पेरणे, ता हवेली, जि पुणे) ही तिच्या घराच्या मागे भट्टी लावून दारू काढत असताना मिळून आली. तिचे ताब्यात सुमारे १४० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व २५०० लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण १,९८,००० रू किं चा मुद्देमाल मिळून आला आहे. तिचे विरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तसेच लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत समतानगर, लोणी काळभोर येथे मंगल संगम आडगळे वय ४५ रा. समतानगर, लोणी काळभोर, पुणे हिचे ताब्यात एकूण ५७३०/- रु कि चे ३५ लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू व रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आला आहे. तिचेविरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी शैलेश बलकवडे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त , गुन्हे, राजेंद्र मुळीक सहा पोलीस आयुक्त २ यांचे मार्गदर्शनाखाली वाहीद पठाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट ६ पुणे शहर, संभाजी सकटे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, बाळासाहेब तनपुरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे या पथकाने केली.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page