- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणमांडवगण फराटा येथे उद्या श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचा १६ वा वर्धापन...

मांडवगण फराटा येथे उद्या श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचा १६ वा वर्धापन दिन

- Advertisement -spot_img

शिरूर तालुका प्रतिनिधी : अल्लाउद्दीन अलवी
मांडवगण फराटा, ता शिरूर येथे श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेचा १६ वा वर्धापन दिन फराटे पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये उद्या रविवारी दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वा. माजी न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय बी जे कोळसे पाटील यांच्या अध्यक्षते खाली संपन्न होत आहे. यावेळी भारतीय वन सेवा अधिकारी अक्षय वाले (आयपीएस), डॉ .टी एम देशमुखसाहेब अध्यक्ष लोक कल्याण मानव सेवा समिती महाराष्ट्र राज्य, (कोहिनूर ग्रुप सीएमडी) आदी उपस्थित राहणार आहेत.


तरी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ पालक वर्ग व विद्यार्थी यांनी उपस्थित राहण्याचे यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजीव पाटील फराटे यांनी आव्हान केले आहे. तसेच राजीव पाटील फराटे यांचे बरोबर काम करणारे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ पिंटू पाटील फराटे, संस्थेचे सचिव मृणाल पाटील फराटे, विश्वस्त कॅम्पस संचालक संग्रामराजे धावडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. तसेच सुसज्ज इमारत, उच्च शिक्षित शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थ्यींना स्वतंत्र वस्तीगृह व जेवणाची उत्तम अशी सोय प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली आहे. विविध राज्यातून या ठिकाणी मुलांचा ओघ वाढला असून विद्यार्थ्यांना पूर्ण सुरक्षित, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत शिरूर तालुक्याच्या भीमा नदी काठाच्या कुशीत असे मांडवगण फराटा येथे इन्स्टिट्यूट उभारून ग्रामीण भागाला चांगल्या प्रकारची सोय उपलब्ध करून व शहरी इन्स्टिट्यूटचा पालक वर्ग, विद्यार्थ्यांना न सोसणारा खर्च तसेच ७० ते ७५ टक्के मार्क पडणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देताना विद्यार्थ्यांना दत्त घेऊन त्यांच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्चाचा भार संस्थेच्या माध्यमातून केला जातो.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

या संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आयपीएस अधिकारी उत्पादन शुल्क अधिकारी असे तब्बल नऊ अधिकारी या संस्थेच्या माध्यमातून घडले, अशा प्रकारची शिक्षणाची सोय होण्यासाठी संस्थेने फराटे पाटील इन्स्टिट्यूटची उभारणी केली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजीव पाटील फराटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page