वाघोली प्रतिनिधी : रामदास जाधव
महिलांनी स्वतःच्या सक्षमीकरणाच्या आणी आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने विविध क्षेत्रात काम करून स्वावलंबी बनले पाहिजे असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अर्चना शांताराम कटके यांनी केले.
सिने कलाकार तसेच रा. कॉ. महिला आघाडीच्या शितल चंदनशिव यांच्या बकोरी रोड, यशवंत नगर येथील सृष्ठी ब्युटीपार्लर चे अर्चना कटके आणी राष्ट्रवादी काँग्रेस च्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष ज्योती थोरात यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले त्या प्रसंगी कटके बोलत होत्या.
सद्य:स्थितीत सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा व इतर सर्व क्षेत्रात महिलांचे योगदान वाढले आहे, महिलांनी अधिक स्वालंबी तसेच आत्मनिर्भर बनण्याची आवश्यकता आहे आणी महिलांच्या प्रगतीसाठी समाजानेसुद्धा सहकार्य केले पाहिजे असेही कटके म्हणाल्या.

राज्य आणी केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी विविध विकास योजना आखल्या आहेत या योजनांचा लाभ महिलां, युवती यांनी घ्यावा असे आवाहन श्रीमती ज्योतीताई थोरात यांनी या प्रसंगी केले.
या वेळी महिला आघाडीच्या वनिता प्रकाश जमधडे, रुपाली घाडगे, योगिता इंगवले, नेहा खंदारे, दीपमाला अरविंद, हर्षदा, भाग्यश्री केकाण, मंजू लोंढे, वैशाली कांबळे, निशा लोंढे, छाया लांडगे, छाया चव्हाण, ज्योती देशमुख, वर्षा वानखेडे, ज्योती शिंदे, सविता अंभोरे, तेजस्वी गिते, भाग्यश्री जाधव, मेघना साठे,कोमल, जयश्री कुलकर्णी, दीक्षिता चौधरी, चंद्रभागा जाधव, रोशनी पुणेकर, चैत्राली गायकवाड,, रेश्मा वाळवे, पूनम गुप्ता, संध्या आठवले, खुशबू चौधरी, संचिता जमधडे,सुजाता जाधव, अलका आचारी, डॉ.सौ. साळवे, कीर्ती आचारी, सौ. मस्के, अश्विनी रणभीर, प्रियांका रणभीर, नेहा इ. असंख्य महिलांसह जेष्ठ पत्रकार रामदास जाधव, निलेश गायकवाड, दिलीप कुलकर्णी, डॉ. विजय साळवे, डॉ. रवींद्र साळवे, संदीप म्हस्के, दीपक इंगवले, अस्लम शेख, गणेश चंदनशिव, संजय म्हस्के, नितीन वानखेडे, मदिनाथ म्हस्के, काकासाहेब वाळवे,दत्तात्रय कांबळे, वसंत जाधव, सुरज गिते, सुदर्शन जाधव,अधिनाथ म्हस्के, गणेश म्हस्के आदी उपस्थित होते. सर्वांचे आभार शितल चंदनशिव यांनी मानले.





