गजानन गव्हाणे पाटील
पेरणे फाटा, ता. हवेली येथील रामराज्य प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सव मोठ्या जल्लोषात वेगवेगळे उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यावेळी घटस्थापना ते विजयादशमी व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवित नवरात्री उत्सवाची सांगता करण्यात आली असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष फिरोज शेख आणि संस्थापक हेमंत माने यांनी आपली लोकशाही शी बोलताना सांगितले.

रामराज्य प्रतिष्ठान च्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात नवरात्री उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, लहान मुलांसाठी डान्स स्पर्धा, महिलांसाठी दांडिया, होम मिनिस्टर, मंगळागौरी, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची आदी उपक्रम राबविण्यात आले. होम हवन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तसेच दसऱ्याच्या दिवशी बक्षीस वितरण व रावण दहन कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी.शेकडो नागरिक व मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.

संपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन आणि नियोजन रामराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक हेमंत सुरेश माने, अध्यक्ष फिरोज शेख, उपाध्यक्ष नागेश मोकळे, कार्याध्यक्ष समीर पठाण, खजिनदार चेतन सोनवणे, मार्गदर्शक- विकास धारणे, सह खजिनदार श्रीराम घाडगे, तसेच प्रतिष्ठान चे सदस्य वैभव जाधव, प्रज्वल रणपिसे, राहुल सराटे, जमीर तांबोळी, ऋषी आगाशे, डॉ. प्रणव भिलारे, रोहित गजरे, अथर्व जाधव, ऋषी पाचरणे, प्रज्वल तिखे, आदेश माने, राज मिसाळ, दिगंबर कुऱ्हाडे, सार्थक खरजुले, ओम मस्के, रोहन चालक यांनी केले.


तसेच या संपूर्ण नवरात्री उत्सवासाठी संतोष येवले (युवा उद्योजक), सरपंच उषा दशरथ वाळके, माजी सरपंच निलेश आनंदा वाळके, दादासाहेब माने (खरेदी विक्री संघ), निलेश प्रभाकर वाळके, कुलदीप (भाऊ) वाळके, माजी उपसरपंच रवींद्र वाळके, सामाजिक कार्यकर्ते केशव टुले, दत्ता (आबा) वाळके, प्रशांत वाळके, ग्रामपंचायत सदस्य विश्वास वाळके, दिनेश वाळके, संकेत वाळके, अक्षय वाळके, दीपक वाघमारे, सुनील अवचार, कल्पना वाळके, सुजित वाळके, गणेश येवले, माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम वाळके, पी आर पाटील, त्याच बरोबर पवित्रा इंगळे, आशा साळुंखे, सरला मोकळे, अंजली चालक, संचालिका न्यू विसडन इंटरनॅशनल स्कूल श्रुतिका रणसिंग आदींनी सहकार्य केले.





