- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणआळंदीत माऊलींचे पालखीचे हरिनाम गजरात सीमोल्लंघन

आळंदीत माऊलींचे पालखीचे हरिनाम गजरात सीमोल्लंघन

- Advertisement -spot_img

श्री खंडोबा देवदर्शनास गर्दी
आळंदी देवाची : अर्जुन मेदनकर
येथील खंडोबाचे माळरानावर माऊलींचे पालखीसह श्री रामाची पालखी, श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज पालखी, श्री भैरवनाथ महाराज ग्रामदैवत पालखीचे हरीनाम गजरात विजया दशमी दिनी सीमोल्लंघन उत्साहात झाले. श्रींचे सीमोल्लंघन प्रसंगी भाविक, नागरिकांनी पालखीतील श्रींचे दर्शनासह श्री खंडोबा देवदर्शनास गर्दी केली. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे वतीने यावर्षी लक्षवेधी विद्युत रोषणाई, मंडप व्यवस्था करण्यात आली होती.


परंपरेने ग्रामदैवत श्री खंडोबा मंदिर माळरानावर या प्रसंगी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथसाहेब, श्री आवेकर – भावे राम मंदिर संस्थानचे विश्वस्त अध्यक्ष संजय आवेकर, बिपीन चोभे, सुनील भदे, गजानन काळे, रघुवीर ओक, नरहरी महाराज चौधरी, मोहन महाराज शिंदे , व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने, श्रीधर सरनाईक, आळंदी खंडोबा मंदिरात आळंदी ग्रामस्थ, नगारखाना प्रमुख सचिन रानवडे, बाळासाहेब भोसले, नरहरी महाराज चौधरी, श्रींचे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे, स्वामींचे पुजारी गांधी परिवार, माऊलींचे मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, संतोष मोझे, योगेश आरु,पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांचे सह आळंदीतील विविध मंदिर देवस्थानचे प्रमुख पदाधिकारी, आळंदी ग्रामस्थ, भाविक तसेच वारकरी उपस्थित होते. श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेसह विविध वारकरी शिक्षण संस्थात शिक्षण घेणारे वारकरी साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री खंडोबा मंदिर माळरानावर परंपरेने शहरातून नागरिक, भाविक यांनी श्रीचे पालखीचे दर्शनास गर्दी केली. टाळ, मृदंग, वीणेच्या त्रिनादात दिड्यातील भाविक श्रींचे पालखीसह नामजयघोष करीत श्री खंडोबाचे दर्शनासह श्रींचे पालखी दर्शन आणि सीमोल्लंघनास उपस्थित होते. विजया दशमी निमित्त माऊली मंदिरात पहाटे घंटानाद, काकडा आरती, पवमान अभिषेक पूजा, भाविकांच्या महीम्न पुजा, अभिषेक प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांचे हस्ते झाला. भाविकांचे श्रीचे संजीवन समाधी दर्शन, श्रीना महानैवेध्य, शमी पूजन, विना मंडपात प्रवचन सेवा उत्साहात झाल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

श्रीचे पालखीचे शाही लवाजम्यासह सीमोल्लंघनास हरिनाम गजरात विविध मंदिरातून प्रस्थान झाले. आळंदी देवस्थानतर्फे श्रींची पालखी मंदिरात परत आल्यानंतर धुपारती त्यानंतर श्रीची नित्य नैमितिक पूजा आरती, विजया दशमी निमित्त आळंदीतील श्री रामाची, श्री स्वामी महाराज यांचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा आणि मंदिरात आगमना निमित्त स्वागत उत्साहात झाले. यावेळी संस्थांन चे वतीने विविध देवस्थानचे प्रमुखांसह मानकऱ्यांना नारळ प्रसाद देण्यात आला.
विजयादशमी दसरा आणि नवरात्रीतील प्रथा परंपरांचे पालन करीत आळंदीत संस्कृती जोपासण्यास प्राधान्य देण्यात आले. सोन्याचे प्रतिक असलेली आपट्याची पाने भाविक, नागरिकांनी एकमेकांना देत चांगले विचार जोपासण्याचा संदेश दिला. आळंदीतील मंदिरात भाविकांनी दर्शनास तसेच प्रागंणात नव्या गाड्यांचे पूजनास गर्दी केली. श्रींचे सीमोल्लंघन प्रसंगी श्रींचे पालख्यान समोर भजन ,अभंग, आरतीत भाविक तल्लीन झाले. नागरिकांनी यावेळी उत्स्फूर्त गर्दी केली.
श्रींचे पालखी मार्गावर दुतर्फा नागरिकांनी श्रींचे दर्शन घेतले. येथील भाईचारा फाउंडेशन कार्याध्यक्ष सुलतान शेख, राजेंद्र धोका परिवार यांनी पालख्याचे स्वागत केले. यावेळी क्रांती पार्क मधील नागरिक उपस्थित होते. आळंदीत विविध ठिकाणी विजया दशमी दसरा निमित्त नवोपक्रमांची सुरुवात झाली. विविध व्यापारी आस्थापनांमध्ये गृहोपयोगी वस्तूंचे खरेदीस ग्राहकांनी मोठी गर्दी केली. आळंदी तीर्थक्षेत्रात परंपरेचे पालन करीत विजया दशमी साजरी करण्यात आली. सीमोल्लंघन प्रसंगी भाविकांनी सोन्याचे प्रतीक असलेली आपट्याची पाने भेट देत एकमेकांना आलिंगन देत गळा भेट घेत उत्साहात शुभेच्छा दिल्या. आळंदी येथील पद्मावती देवी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत नवरात्रोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी आळंदी देवस्थान आणि रानवडे परिवार यांनी भाविकांचे स्वागत करीत सेवासुविधा देत कमी वेळेत भाविक, महिला, पुरुषांना देवदर्शनची व्यवस्था करण्यास दहा दिवस परिश्रम घेतले. आळंदी पोलीस स्टेशनचे वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग सतीश नांदुरकर यांनी या काळात सुरळीत सुरक्षित वाहतुकीचे नियोजन केले. पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांनी पालखी प्रदक्षिणा दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांचे मार्गदर्शनात बंदोबस्त प्रभावी ठेवत सुरळीत, सुरक्षित रहदारी ठेवण्यास परिश्रम घेतले. माऊली मंदिरात दसऱ्या निमित्त लक्षवेधी फुलांची सजावट करण्यात आली होती. नवरात्री निमित्त विविध मंडळांनी विविध स्पर्धा आणि दांडीयांचे कार्यक्रम उत्साहात केले. यास मोठा प्रतिसाद मिळाला. येथील श्री गज लक्ष्मी मंदिर चावडी चौक, श्री काळेश्वरी मंदिर, श्री तुळजा भवानी मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर येथे परंपरेने धार्मिक कार्यक्रम विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या. श्री महालक्ष्मी मंदिर येथे समाजरत्न नानजीभाई ठक्कर यांचे मार्गदर्शनात पूजा आरती झाली. संयोजक मनोहर दिवाने परिवार तर्फे स्वागत करण्यात आले. माहिती सेवा पुरस्कार मिळाल्या बद्दल अर्जुन मेदनकर यांचा सत्कार महालक्ष्मी देवस्थान तर्फे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कु-हाडे यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर, उदय काळे, राजेश नागरे, गोविंद ठाकूर, बाबासाहेब ठाकूर, गोविंदा कुऱ्हाडे, बाबासाहेब भंडारे, तुकाराम महाराज ताजने, वैभव टोपे, आळंदी येथील नवरात्र उत्सवात आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त भावार्थ देखणे यांचे नियंत्रणात व्यवस्थापक माऊली वीर यांनी तसेच पद्मावती मंदिर येथे येथील ग्रामस्थ रानवडे परिवार यांनी विशेष परिश्रम घेत नवरात्र उत्सव यशस्वी केला.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page