रा. महिला काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने आंदोलन
वाघोली प्रतिनीधी : विजय लोखंडे
“राज्यातील स्त्री सन्मानाचा लढा म्हणून नाकारत्या सरकारच्या तीन तोंडी रावणाचा वध” असे राज्यव्यापी आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यामध्ये हवेली तालुक्यातील श्री क्षेत्र वाडेबोल्हाई येथे बोल्हाई देवी मंदिर परिसरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस(शरद पवार) हवेली तालुका पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या हवेली तालुकाध्यक्षा तथा वाडे बोल्हाईच्या माजी उपसरपंच सुरेखा शिवाजी भोरडे, युवक राष्ट्रवादीचे शिरूर हवेली विधानसभेचे अध्यक्ष योगेश शितोळे यांच्या नेतृत्वाखाली येथे नाकारत्या सरकारच्या तीन तोंडी रावणाचे दहन करून आंदोलन करण्यात आले. यावेळी नाकारत्या सरकारच्या तीन तोंडी रावणाचे दहनाचे बॅनर/पोस्टर जाळण्यात आले. तर नाकारत्या सरकारच्या विरोधात “लेकी बाळीनवर अन्याय होत नाही सहन; चला करूया तीन तोंडी रावणाचे दहन !” “महिला अत्याचारांना नको थारा; या सत्याधाऱ्याना हाणून पाडा !” अशा घोषणा राष्ट्रवादीच्या महिला व पुरुष पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरद पवार) हवेली तालुका पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या हवेली तालुकाध्यक्षा तथा वाडेबोल्हाच्या माजी उपसरपंच सुरेखा शिवाजी भोरडे, युवक राष्ट्रवादीचे शिरूर हवेली विधानसभेचे अध्यक्ष योगेश शितोळे, वाडेबोल्हाईचे माजी आदर्श सरपंच दिपक गावडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या हवेली तालुका उपाध्यक्षा सुप्रिया घावटे, युवा नेते प्रवीण भोर, सोमनाथ गावडे, उपसरपंच मनीषा कड, ग्रामपंचायत सदस्या संध्या गावडे, ग्रामपंचायत सदस्या सोनाली शिंदे, अनिता इंगळे, मनीषा भालेकर, अलका कारंडे, शिंदे आजी, निकाता भोरडे आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

नाकारत्या सरकारमुळे राज्यात स्त्री अत्याचार वाढले असून बदलापूर अत्याचार प्रकरण व ताजे घडलेले बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरण अशाप्रकारे राज्यात या महायुतीच्या सरकारच्या काळात महिला असुरक्षित असून महिलांवर अत्याचार वाढले आहेत. यावर या राज्य सरकारला अंकुश ठेवला आला नसल्याने स्त्री सुरक्षितते बाबत हे तीन तोंडी रावण सरकार अपयशी ठरल्याने या महायुतीच्या सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत.
सुरेखा शिवाजी भोरडे, अध्यक्षा-राष्ट्रवादी महिला काँग्रेस(शरद पवार) हवेली तालुका





