- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणआळंदी पद्मावती देवी मंदिरात नवरात्र उत्सवास प्रारंभ मंदिर वैभवात वाढ ; आळंदी...

आळंदी पद्मावती देवी मंदिरात नवरात्र उत्सवास प्रारंभ मंदिर वैभवात वाढ ; आळंदी देवस्थानच्या कार्याचे कौतुक

- Advertisement -spot_img

मंदिर वैभवात वाढ ; आळंदी देवस्थानच्या कार्याचे कौतुक
आळंदी देवाची : अर्जुन मेदनकर
येथील पद्मावती देवी मंदिरात आळंदीतील धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत नवरात्र उत्सवास विविध धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ झाला आहे. बुधवारी ( दि. ९ ) दुपारी माऊली मंदिरातून श्रींची पालखी परंपरेने पद्मावतीस हरिनाम गजरात निघणार आहे. अशी माहिती मंदिराचे मुख्य व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.
नवरात्री निमित्त आळंदी देवस्थानच्या वतीने मंदिरात परंपरेने पूजा करून उत्सवास सुरुवात झाली आहे. नवरात्री निमित्त भाविकांची गर्दी वाढत आहे. पद्मावती मंदिरात परंपरेने आळंदी ग्रामस्थ श्री रानवडे परिवाराचे वतीने भाविकांचे, नागरिकांचे स्वागत, श्रींची पूजा आदी धार्मिक कार्यक्रमांना परिश्रम पूर्वक यशस्वी केले जात आहे. येथे अनेक वर्षांपासून रानवडे परिवार सेवारत आहे.
श्री पद्मावती देवी मंदिर परिसर प्रांगणात वैभवी सभागृह आणि बागबगीचा विकसित करून आळंदी देवस्थानने पद्मावती मंदिर परिसराचे वैभवात वाढ केली आहे. यामुळे आळंदी देवस्थानचे या वेगळ्या आणि आळंदीच्या वैभवात वाढ करणाऱ्या उपक्रमाचे परिसरात भाविकांतून कौतुक होत आहे.
नवरात्रात श्रीची पालखी माऊली मंदिरातून येथे परंपरेने येत असते. येथे पूजा आरती, महाप्रसाद, विसावा, हरिनाम गजर करीत श्रीची पालखी विश्रांतवड मार्गे भोसले वस्ती येथे विसावा घेत मंदिरात रात्री हरिनाम गजरात परतत असते.
पद्मावती देवीचे मंदिराचे वैभवात वाढ केल्याने भाविकांची श्रीचे दर्शनास गर्दी वाढू लागली आहे. परिसरात लोकवस्ती देखील वाढल्याने पद्मावती मंदिर विकसित करण्याचे निर्णयाचे परिसरातून देखील स्वागत करण्यात आले आहे. पर्यटन स्थळ म्हणून देखील या कडे पाहिले जाऊ लागले आहे. काही तास विश्रान्ती घेत भाविक आळंदीत परततात. आळंदीतील श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरा पासून सुमारे दीड किलो मीटर अंतरावर व ज्ञानेश्वरांच्या भिंती पासून जाणाऱ्या रस्त्यावर पुढे पद्मावती देवीचे मंदिर आहे. नवरात्रात (अश्विन शुद्ध १ ते ९ ) या देवीची यात्रा असते. प्रथा परंपरांचे पालन करीत आळंदी मंदिरातून श्रीची पालखी एक दिवस नवरात्रात अश्विन शुद्ध ५ किंवा ७ ला श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी हरिनाम गजरात जात असते. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. येथे ग्रामस्थ श्री रानवडे परिवाराचे वतीने परंपरेने धार्मिक सेवा, पूजा, स्वागत आदी नियोजन केले जाते. आळंदी परिसरातील भाविक, महिला, नागरिक,शालेय मुले सहलीने नवरात्रात पद्मावती देवीचे दर्शनासह देवीला नैवैद्य अर्पण करून भोजन करतात. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज सुरुवातीला एकांत वास आणि ध्यान धारणा यासाठी या परिसरातील मंदिरात येत असत. आळंदी देवस्थानने पद्मावती मंदिर परिसरात मंदिराचे वैभवात वाढ करणारे संगमरवरी दगडातील मंडपाचे बांधकाम करून कीर्तन, भजन मंडप विकसित केला आहे. या सह प्रांगणात विविध वृक्षांचे रोपण व संवर्धन करून बाग तयार केली आहे. येथील बागेत तुळशीची रोपे देखील बहरलेली पाहण्यास मिळतात. भाविकांना बसण्याची उत्तम व्यवस्था आणि पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था आकर्षक प्रवेशद्वार, संरक्षण भिंत, रंगसंगती ने आणखी वाढ करीत परिसराला महत्त्व प्राप्त करून दिले आहे. येथील ओढ्याचे मजबुतीकरण करून बाग देखील प्रशस्त विकसित केली आहे. तीर्थक्षेत्रविकास आराखड्यातून येथील रस्ता देखील सिमेंटीकरणाने सजला आहे. यामुळे भाविकांची सोय झाली आहे. यामुळे पद्मावती देवींचे दर्शनास भाविकांची गर्दी वाढत आहे.
नवरात्रात भाविकांना महाप्रसाद वाटप भक्ती भावात केले जाते. गावकरी भजन, हरिनाम गजर धार्मिक कार्याने या मंदिराचे परिसरात समाधानाचे वातावरण कायम रहात असल्याने अनेक नागरिक, भाविक यांनी या परिसरात लोकवस्ती साठी जागा घेत आपापल्या निवासाची सोय केली आहे.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

आळंदी मंदिरात आदिशक्ती श्री मुक्ताई मंदिराचे सभागृहा पुढे महिला भजनी मंडळाचे भजन, पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले. येथील व्यापारी तरुण मंडळाने परंपरेने महाद्वारात नवरात्री निमित्त देवीची मुर्ती स्थापित केली आहे. येथील श्री काळेश्वरी देवी मंदिरात देखील धार्मिक उपक्रम केले जात असून येथील नियोजन बंटी वाघमारे करीत आहेत.
जागर नारी शक्तीचा उत्सव नवरात्रीचा सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रतिसाद
चऱ्होली खुर्द ग्रामपंचायत सदस्य आणि चेअरमन अनिकेत कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शन देखील नवरात्री निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागर नारी शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या काळात प्रत्येक क्षेत्रात महिला या अग्रेसर असताना आपण पाहत आहोत. नवरात्र म्हणजे सन्मान नारी शक्तीचा आपल्या माता भगिनींचा या उद्देशाने नवरात्र उस्तवा निम्मित सोसायटी चेअरमन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिकेतदादा कुऱ्हाडे यांनी आज माताभगिनी साठी भव्य गरबा आणि रास दांडिया आयोजित केला. यास महिलांसह युवक, तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अनिकेत कुऱ्हाडे पाटील यांचे तर्फे पारितोषिकांचे वाटप आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी महिला सक्षमीकरणास प्राधान्य देण्यात आल्याचे ग्रामपंचायत सदस्य संयोजक अनिकेत कुऱ्हाडे यांनी सांगितले. याशिवाय वर्षभर माता भगिनीसाठी विविध उपक्रम राबविण्याले जातील असे सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page