गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील जनसेवा तरुण मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सोव मंडळांकडून उत्सवाच्या या वर्षी मंडळाने सामाजिक कार्यक्रमावर भर देत स्त्रीयांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यासाठी के. ई. म हॉस्पिटल वढू बुद्रुक, घरडा केमिकल्स आणि जीनपाथ यांच्या संयुक्त सहकार्याने मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले.

यामध्ये गर्भाशय, मुखाचा कर्करोग, एच. पी. व्ही, डी. एन. ए. यांची तज्ज्ञ स्त्री रोग डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. या शिबिराच्या माध्यमातून तब्बल १०४ स्त्रियांनी या शिबिराचा लाभ घेतला.
तसेच केईम हॉस्पिटलचे डॉ अरुणकुमार गोंधळी, ज्योती माने, सुजाता माने, घरडा केमिकल्सच्या विद्या डाकले यांनी महिलांची तपासणी करून मोलाचे मार्गदर्शन केले. दैनंदीन धावपळीत आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी सामान्य माणसांना वेळ नसतो. हीच बाब लक्षात घेत जनसेवा नवरात्र उत्सव मंडळ कोरेगाव भिमा यांच्या वतीने परिसरातील सर्व नागरिकांसाठी भव्य आरोग्य चिकित्सा शिबीर भरवण्यात आले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जय जिजाऊ महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा कोमल सत्यनारायण ढेरंगे, नवसंजीवनी महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा मीनाश्री हरगुडे तसेच ग्रामसंघाच्या सर्व महिला पदाधिकारी आदींनी कार्यक्रमासाठी मोलाची मदत केली.





