गजानन गव्हाणे पाटील
शिरूर हवेली चे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून मांडवगण फराटा, ता. शिरूर येथे तब्बल दोन कोटी पस्तीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. यावेळी गावातील आजी-माजी पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
मांडवगण फराटा येथील भूमिपूजन व उद्घाटन यावेळी आमदार अशोक पवार यांचे हस्ते करण्यात आले. या विकास कामांमध्ये प्रामुख्याने मांडवगण फराटा येथील सरकारी दवाखान्या शेजारील व्यापारी गाळे बांधकाम करणे (४५ लक्ष रुपये), मांडवगण फराटा गणपती माळ तावरेवस्ती कोळगांव डोळस रस्ता करणे (४० लक्ष रुपये), मांडवगण फराटा येथील शिरसगांव रोड ते जगतापवस्ती रस्ता करणे (१० लक्ष रुपये), मांडवगण फराटा कोळगांव डोळस रस्ता ते एन.डी. दादा फराटे वस्ती रस्ता करणे (१० लक्ष रुपये), गणेगाव मांडवगण रोड ते जगतापवस्ती बाभुळसर रस्ता करणे ग्रा.मा. १२२ (३० लक्ष रुपये), मांडवगण फराटा गावाजवळील पुल बांधणे (१ कोटी रुपये).

कोट्यावधी रुपयांची विकास कामे होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत येणाऱ्या विधानसभेत आपणच विजय व्हाल असा विश्वास यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.





