- Advertisement -spot_img
Homeसामाजिक उपक्रमप्रीती महिला बचत गटाच्या माध्यमातून मोहटा देवी दर्शन यात्रेचे आयोजन

प्रीती महिला बचत गटाच्या माध्यमातून मोहटा देवी दर्शन यात्रेचे आयोजन

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
नवरात्रीचे औचित्य साधून केसनंद, ता. हवेली येथील प्रीती महिला बचत गटाच्या माध्यमातून गटाच्या अध्यक्ष तसेच हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा सीता रामदास जाधव यांच्या पुढाकाराने नुकतीच मोहटा देवी दर्शन ट्रिप काढण्यात आली.
यावेळी असंख्य महिलांनी यामध्ये सहभागी घेतला. मोठा देवी ट्रीपच्या अंतर्गत श्रीक्षेत्र वाडे बोल्हाई येथील बोल्हाई माता, मढी येथील कानिफनाथ मंदिर या स्थळांना देखील भेटी देत दर्शन घेण्यात आले.
प्रीती महिला बचत गट यांच्या द्वारा आयोजित मोहटा देवी दर्शन यात्रेचे बचत गट अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट सिता रामदास जाधव, तालुका अध्यक्ष सुरेखा भोरडे, जिल्हा अध्यक्ष उद्योग व्यापार सेल कामिनीताई ताकवले, उद्योग व्यापार विभाग सेल सरचिटणीस मंगलताई नागवडे आदींनी याचे नियोजन व व्यवस्थापन केले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

अनेकदा महिलांना घरच्या जबाबदाऱ्या पार पडत असताना स्वतःसाठी लक्ष देता येत नाही परंतु बचत गटाच्या माध्यमातून श्रावण महिन्यात साडेतीन शक्तीपीठांचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बचत गटाचे अध्यक्ष सीता जाधव यांनी “आपली लोकशाही”शी बोलताना दिली.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page