अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात सेवारत
आळंदी देवाची : अर्जुन मेदनकर
येथील अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ए आय डी एस विभाग प्रमुख प्रा. भाग्यश्री मनीष ढाकुलकर यांना डी वाय पाटील विद्यापीठ, आंबी येथील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विद्या शाखा अंतर्गत डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
‘ए नोबेल ॲप्रोच टू एनहान्स सिक्युरिटी इन व्हेईक्युलर क्राउडसेंसीग डाटा’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. या कामी त्यांना डी वाय पाटील विद्यापीठ आंबी डॉ पूजा शर्मा यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. प्रा. भाग्यश्री मनीष ढाकुलकर यांचे संशोधनपर शोधनिबंध स्कोपस इंडेक्स डब्लू, यु.जी. सी. सारख्या राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले असुन अनेक परिसंवाद व परीषदांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग देखील घेतला आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाच्या संचालिका डॉ कमलजीत कौर, प्राचार्य डॉ. एफ बी सय्यद, महाविद्यालयातील सर्व विभागातील विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.





