गजानन गव्हाणे पाटील
वाघोली, ता.हवेली येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार उपस्थित नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले, यामध्ये वाघोली मधील विविध सोसायटीच्या रस्त्याच्या विकास कामांचा समावेश आहे.
केसनंद रोडवरील श्रीराम सोसायटीकडे जाणारा रस्ता (५ लक्ष ४२ हजार), केसनंद रोड ते सिट्रॉन सोसायटीकडे जाणारा रस्ता ( ५ लक्ष रुपये ), हिलशायर सोसायटी रस्ता करणे (५ लक्ष), साई रेसिडेन्सी राधिका विहार सोसायटी रस्ता(१० लक्ष), आळवाडी रोड येथील ब्लीच आयकॉन सोसायटी रस्ता (७ लक्ष ५० हजार), राजस्थानी कॉलेज रस्ता ते ऐश्वर्या लक्ष्मी सोसायटी रस्ता करणे,(७ लक्ष) रोहन अभिलाषा फेज २ समोरील रस्ता (१० लक्ष रुपये) अशा विविध रस्त्याचे भूमिपूजन आमदार पवार यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.

यावेळी मा सरपंच वसुंधरा उबाळे, शिवसेना नेते संजय सातव पाटील, शिवदास उबाळे, बाळासाहेब सातव, संदीप गोते, शिवसेना हवेली तालुकाप्रमुख युवराज दळवी यांच्यासह विविध पदाधिकारी व ग्रामस्थ आणि सोसायटी धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





