गजानन गव्हाणे पाटील
भविष्यात वाजेवाडी – मांजरेवाडी या गावातील विविध विकास कामांसाठी विशेष विकास निधी देऊ असे आश्वासन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिले. वाजेवाडी ता. शिरूर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदारांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधताना आमदार बोलत होते.
यावेळी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विश्वासकाका ढमढेरे, वढू बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, आपटीचे सरपंच अतुल ढगे, वाजेवाडीच्या सरपंच पूनम चौधरी, उपसरपंच मंगल तिखे, माजी उपसरपंच रामदास मांजरे, ग्रामपंचायत सदस्या श्वेता मांजरे, सुरेखा मांजरे, राजू मांजरे, संतोष मांजरे, गणेश शेळके, ग्रामसेविका लगड, उपशाखा अभियंता गावडे, शिवाजी भोंडवे, आप्पासाहेब वाजे, बाळासाहेब मांजरे, नाना वाजे, सचिन वाजे, ज्ञानेश्वर वाजे, राहुल वाजे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी आदर्श सरपंच धर्मराज वाजे, माजी सरपंच आबासाहेब वाजे यांनी प्रस्ताविक भाषणे केले.
वाजेवाडी साठी एक कोटी ४२ लाख रुपये निधी दिल्याबद्दल धर्मराज वाजे यांनी आमदार अशोक पवार यांचे आभार मानले तर उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यासाठी आमदारांनी ठेकेदाराला सूचना केल्या.
नितीन वाजे यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले.





