- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगांव भिमा नं.२ वि. का. सहकारी संस्थेच्या वतीने सभासदांना १०% लाभांश

कोरेगांव भिमा नं.२ वि. का. सहकारी संस्थेच्या वतीने सभासदांना १०% लाभांश

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगांव भिमा नं.२ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा हनुमान मंदिर, बाजार मैदान कोरेगांव भिमा या ठिकाणी कोरेगांव भिमा, डिंग्रजवाडी, वाडा पुनर्वसन येथील शेतकरी सभासद व ग्रामस्थांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
कोरेगांव भिमा नं.२ वि.का.संस्थेच्या वतीने सभासदांना १०% लाभांश देण्याचे ठरविले असुन पुढील काळात संस्थेच्या हिताचा विचार करून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संस्थेचे चेअरमन अशोक काका गव्हाणे यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे सचिव मधुकर कंद यांनी या आर्थिक वर्षातील अहवाल, ताळेबंद यांचे वाचन केले. संस्थेचा नफातोटा, थकबाकी, सभासद उपस्थिती, लेखापरीक्षक नेमणूक, पुढील वर्षाचे अंदाजपत्रक, क्षेत्र नसलेले सभासद कमी करणे याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच सभासदांना सहकार प्रशिक्षण पुणे जिल्हा सह. बोर्डाचे प्रशिक्षक आर. जे. मोहिते यांनी सहकारी कायदा, तत्वे या विषयी माहिती दिली.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन रामदास कांबळे, संचालक बबुशा ढेरंगे, पंडीत फडतरे, नागेश गव्हाणे, अनिल गव्हाणे, महादेव फडतरे, अशोक नाबगे, प्रविण गव्हाणे, बाळासो वाडेकर, विमलताई शिंदे, सारिका गव्हाणे, संतोष माकर, नितिन गव्हाणे तसेच प्रकाश आबासाहेब गव्हाणे, पी.के.अण्णा गव्हाणे, नारायण फडतरे, कैलास सोनवणे, राजाराम ढेरंगे, सरपंच संदीप ढेरंगे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, महेश ढेरंगे आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page