- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणआळंदी ग्रामीण रुग्णालयास शासनाचा कायाकल्प पुरस्कार जाहीर

आळंदी ग्रामीण रुग्णालयास शासनाचा कायाकल्प पुरस्कार जाहीर

- Advertisement -spot_img

डॉ. उर्मिला शिंदे यांचा आळंदीत सत्कार
आळंदी देवाची : अर्जुन मेदनकर
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शासकीय रुग्णालयांच्या आरोग्य सेवा सुविधांच्या दर्जावाढ आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांना कायाकल्प पुरस्काराने गौरविण्यात येते. २०२२-२३ या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
खेड तालुक्यातून तीर्थक्षेत्र आळंदीतील आळंदी ग्रामीण रुग्णालयास कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र आणि एक लाख रुपये असे आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांचा आळंदी ग्रामस्थांसह विविध सेवाभावी संस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी ग्यानज्योत इंग्लिश मिडीयम स्कूल संचालिका कीर्ती घुंडरे पाटील, सुमनताई घुंडरे पाटील, आळंदी शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, स्वकुळ साळी ज्ञातीगृह संस्थेचे खजिनदार मनोहर दिवाणे, आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, गौतम पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर बनसोडे, स्टेट बँक ऑफ इंडिया चे जनसंपर्क अधिकारी राज माने, रुग्णालयातील डॉक्टर्स, वैद्यकीय विभागातील कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांचा सत्कार ग्यानज्योत इंग्लिश मिडीयम स्कूल संचालिका कीर्ती घुंडरे पाटील, सुमनताई घुंडरे पाटील यांचे हस्ते करण्यात आला.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

आरोग्य सेवेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याना सार्वजनिक आरोग्य सेवेत स्वच्छ व आरोग्यदायी परिसर यात आरोग्य सेवा सुविधा प्रभावी मिळाव्यात तसेच आरोग्य संस्थांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या आरोग्य सुविधांमध्ये सातत्य ठेवावे, या साठी कायाकल्प पुरस्कार योजना राबविली जात आहे. कायाकल्प पुरस्कार राज्य पातळीवरील असून त्यासाठी आळंदी ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.उर्मिला शिंदे आणि त्यांचे सहकारी, अधिकारी, सर्व कर्मचारी यांची नियमित सातत्याने घेतलेली मेहनत आणि विविध आरोग्य विषयक संख्यात्मक आणि गुणात्मक आरोग्य सेवा देण्याच्या केलेला यशस्वी प्रयत्न यामुळे आळंदी ग्रामीण रुग्णालयास कायाकल्प पुरस्कार मिळाल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.उर्मिला शिंदे यांनी यावेळी सांगितले.
या साठी उपसंचालक डॉ. राधा पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागनाथ येमपल्ले यांचे बहुमूल्य मार्गदर्शनामुळे हा पुरस्कार मिळू शकला असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. हा पुरस्कार मिळालेले इतर रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय दर्जाची असून आळंदी हे ग्रामीण रुग्णालय असूनही हा बहुमूल्य पुरस्कार मिळवत यश मिळवले आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यामुळे आळंदी ग्रामीण रुग्णालयातील सर्व घटकांना आनंद झाला आहे. यापुढे ही असेच आरोग्य सेवेचे कार्य अधिक जोमाने पुढे नेले जाईल आणि दर्जेदार आरोग्यसेवा कायम राहील असे डॉ. उर्मिला शिंदे यांनी सांगितले.
यावेळी नंदकुमार वडगावकर, मनोहर दिवाणे यांनी मनोगते व्यक्त केली. आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी सूत्रसंचालन केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page