गजानन गव्हाणे पाटील
शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार अशोक पवार यांचे कडून शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये करोडो रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येत आहे. यावेळी सर्वच गावच्या ग्रामस्थांनी आमदार अशोक पवार यांचे आभार मानले.

यावेळी शिक्रापूर येथील शिक्रापुर मलठण फाटा चौरासिया चना सेंटर ते अर्जुन भुजबळ घरापर्यंत रस्ता करणे (१० लक्ष रुपये), शिक्रापुर जिल्हा परिषद शाळा चाकण रोड ते चव्हाण वस्ती रस्ता करणे (१० लक्ष रुपये), गडुबाई मंदिर ते इको ग्राम सोसायटी जाणारा रस्ता करणे (२० लक्ष रुपये), राऊतवाडी येथील मनाली हॉटेल राऊतवाडी शिव रस्ता करणे (२५ लक्ष रुपये) तसेच राऊतवाडी फाटा येथील वीटभट्टी ते सावतामाळी मंदीर राऊतवाडी रस्ता करणे (१५ लक्ष रुपये) या कामांचा समावेश आहे. तर पिंपळे जगताप येथील सोंडेकर मळा ते तांबेवस्ती रस्ता करणे (१० लक्ष रुपये), जुने गावठाण पांढरी ते तांबेवस्ती रस्ता करणे (१० लक्ष रुपये) या कामांचे भूमिपूजन पार पडले.

तसेच वाजेवाडी येथे चिंचवस्ती स्मशानभूमी रस्ता करणे (१० लक्ष रुपये), मांजरेवाडी दशक्रिया शेड बांधणे (१० लक्ष रुपये) या कामांचा समावेश आहे. त्याच बरोबर वढू बुद्रुक येथे प्रजिमा १९ ते राणोबाची वाडी रस्ता करणे (२० लक्ष रुपये), आपटी रोड ते कुंडलिक आप्पा भंडारे वस्ती रस्ता करणे (१० लक्ष रुपये) तर आपटी येथे मुंजोबा मंदिर परिसरात ग्रामपंचायत मोकळ्या जागेत सभामंडप बांधकाम (१० लक्ष रुपये) अशी कोट्यावधी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.


या प्रसंगी संबंधित गावचे प्रमुख पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.





