गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा ता. शिरूर येथील धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे नवनिर्वाचित अध्यक्ष व उद्योजक भरत शहाजी गव्हाणे तसेच संस्थापक व माजी सरपंच विजय किसनराव गव्हाणे यांनी आपली लोकशाहीशी बोलताना दिली.


शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापनेच्या दिवशी रात्री आठ वाजता देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून यावेळी नागरिकांनी तसेच दुर्गा माता भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले आहे..


शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया, रासगरबा, ऑर्केस्ट्रा, जादुगार ईश्वर यांचे जादुचे प्रयोग, महीलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम, संगीतखूर्ची व लहान मुलांचे विविध कला गुणदर्शन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.





