- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीण३४ वर्षांपासून घटस्थापने पासून कोरेगाव भिमा येथे दुर्गामाता दौडीचे आयोजन

३४ वर्षांपासून घटस्थापने पासून कोरेगाव भिमा येथे दुर्गामाता दौडीचे आयोजन

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
उत्सव आदिशक्तीचा – सन्मान नरीशक्तीचा या संकल्पनेतून देव – देश – धर्म या साठी उगवत्या सूर्याला साक्ष देऊन तरुण पिढी घडवण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या माध्यमातून कोरेगाव भीमा तर्फे मागील ३४ वर्षांपासून दुर्गा माता दौडीचे आयोजन करण्यात येत आहे.

आदर्श प्रतिष्ठान कोरेगाव भीमा येथे दुर्गामाता दौडीचे नियोजन करताना प्रतिष्ठानचे कार्यकर्ते

३ ऑक्टोंबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी आदर्श चौकातील गणेश मूर्तीचे पूजन व आरती करून दुर्गा माता दौडीला प्रारंभ होणार आहे. शुक्रवार ४ ऑक्टोबर श्री लक्ष्मी मंदिर ढेरंगे चाळ, ५ ऑक्टोबर हनुमान मंदिर बाजार मैदान, ६ ऑक्टोबर म्हसोबा मंदिर फडतरे वस्ती, ७ ऑक्टोबर अहिल्येश्वर शिव मंदिर खालची आळी, ८ ऑक्टोबर शितळादेवी मंदिर नगर रोड, ९ ऑक्टोबर श्री स्वामी समर्थ मंदिर ज्ञानराज नगर, १० ऑक्टोबर श्री दत्त मंदिर दत्तनगर, ११ ऑक्टोबर खंडोबा मंदिर ग्रामपंचायत जवळ तर शनिवार दि. १२ ऑक्टोबर विजयादशमी निमित्ताने कोरेगाव भीमा चे ग्रामदैवत श्री भैरवनाथ येथे आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

अशाप्रकारे यंदाच्या दुर्गामाता दौड चे नियोजन व आयोजन करण्यात आले असून मागील ३४ वर्षांपासून अविरतपणे विना खंड दुर्गामाता दौड साजरी करण्यात येते यामध्ये ध्वज वाहकाच्या पाठीमागे शिस्तबद्ध पद्धतीने शेकडो युवक युवती लहान मुले, महिला गावातून प्रदर्शना घालत असतात यावेळी प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र घेण्यात येतो.
दुर्गा माता दौड नऊ दिवस ज्या ज्या मार्गावरून मार्गक्रमण करत असते त्या मार्गाच्या दोन्ही बाजूला रांगोळी तसेच फुलांची सजावट करण्यात येते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page