- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणआमदार अशोक पवार यांच्या हस्ते कोरेगाव भिमा येथे ३२ लाखांच्या दिव्यांग निधीचे...

आमदार अशोक पवार यांच्या हस्ते कोरेगाव भिमा येथे ३२ लाखांच्या दिव्यांग निधीचे दिव्यांगांना वाटप

- Advertisement -spot_img

सरपंच संदीप ढेरंगे यांच्या पाठपुराव्याला यश
गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील ग्राम पंचायत व सरपंच संदिप ढेरंगे यांच्या माध्यमातून चांगली विकास कामे सुरू असून ४५ दिव्यांग बांधवांना ३२ लाखांचा निधी वितरीत करण्यात आला. कोरेगाव भीमात पावसाचे पाणी साठून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाय केल्याचे समाधान वाटत असल्याचे मत आमदार अशोक पवार यांनी दिव्यांग निधी वितरण कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.


या प्रसंगी प्रसंगी गटविकास अधिकारी महेश डोके, प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे धर्मेंद्र सातव, अनिता कदम, सरपंच संदीप ढेरंगे, पंचायत समितीचे माजी सदस्य पी. के. गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थित निधी वितरीत करण्यात आला.
आमदार अशोक पवार यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना २०१८ ते २०२४ पर्यंतचा ३२ लाख रुपयांचा दिव्यांगाचा निधीचे वाटप सरपंच संदिप ढेरंगे यांच्या माध्यामातून वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांना फेटा बांधून स्वागत करण्यात आले तर प्रास्ताविकात ग्रामविकास अधिकारी श्रीकांत वाव्हळ यांनी दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या ५ टक्के लाभाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर कंद यांनी केले. यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन अशोक गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, बबुशा ढेरंगे, ग्रामपंचायत सदस्या रेखा ढेरंगे, जयश्री गव्हाणे, माजी सदस्या अंजली ढेरंगे, ग्राम विकास अधिकारी सदानंद फडतरे, नितिन गव्हाणे, राहुल ढेरंगे, रवींद्र फडतरे, जयकांत देशमुख, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भांडवलकर व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

दिव्यांग बांधवांच्या २०१८ ते २०२४ असा ३२ लाखांचा निधी वितरीत केल्याचा मनोमन आनंद होत असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असून गावचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन विकासाची कामे करण्यात येत आहे.
आदर्श सरपंच संदिप ढेरंगे, ग्रामपंचायत कोरेगाव भिमा

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page