गजानन गव्हाणे पाटील
वाघोली ता हवेली येथे तब्बल दोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
यामध्ये प्रामुख्याने आरव शेरेटोन सोसायटी समोरील रस्ता करणे यासाठी ४ लाख ५० हजार रुपये, ओमकार सेरेनिटी ते गुरुकृपा सेवाश्रमाकडे जाणारा रस्ता करणे यासाठी ६ लाख रुपये, दुर्वांकुर रेसिडन्सी समोरील रस्ता करणे यासाठी १० लाख रुपये, राज रेसिडन्सी समोरील रस्ता करणे यासाठी ८ लाख रुपये, राधेश्वरीनगरी ते ओंकार निर्वाना सोसायटी रस्ता करणे या साठी लाख रुपये, बकोरी रोड ते कंदनगर लेन नंबर ६ कडे जाणारा रस्ता करणे यासाठी ७ लक्ष रुपये, वाघोली येथील घाडगे बंगला ते गुप्ता बंगल्याकडे जाणारा रस्ता करणे यासाठी १० लक्ष रुपये अशा विविध कामांचा समावेश आहे

याप्रसंगी आमदार अशोक पवार, वाघोलीच्या माजी सरपंच वसुंधरा उबाळे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख युवराज दळवी यांच्या सह ग्रामस्थ, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





