- Advertisement -spot_img
Homeसांस्कृतिकवाडेबोल्हाईत श्री म्हसोबा देवस्थान मंदिराचा कलशारोहन व उत्सव सोहळा जल्लोषात

वाडेबोल्हाईत श्री म्हसोबा देवस्थान मंदिराचा कलशारोहन व उत्सव सोहळा जल्लोषात

- Advertisement -spot_img

 

वाडेबोल्हाई : प्रतिनिधी विजयराव लोखंडे
वाडेबोल्हाई, ता.हवेली येथील इंगळे मळ्यातील प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत श्री म्हसोबा मंदिराच्या देवस्थानच्या मंदिराचा कळसाचा जीर्णोद्धार व कलशारोहन सोहळा उत्सव कार्यक्रम मोठ्या दिमाखात, ग्रामस्थ, भाविक, भक्तांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात आला.
कलशारोहन व उत्सव कार्यक्रमाचा विधी रामदऱ्यातील बालब्रह्मचारी हेमंत पुरी महाराज यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कार्यक्रम प्रसंगी होम, हवन, महापूजा आदी धार्मिक विधी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वाडेबोल्हाईतील सर्व ग्रामस्थ, परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येत उपस्थित होते. सकाळी ९ वाजता होम हवन विधी व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत ढोल-ताशाच्या पारंपारिक वाद्यांत कलश व चांदीच्या पादुकांची वाडेगाव गावठाण लोकवस्तीला वळसा घालीत ते इंगळे मळा-म्हसोबा देवस्थान मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अनेकांनी सहभाग नोंदविला होता.

     दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान महाराजांच्या हस्ते कलश बसविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाचा लाभ ग्रामस्थ, भाविक, भक्तांनी घेतला. यावेळी भजनी मंडळ व म्हातोबा आळंदीचे चेतन शिंदे महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला.
या प्रसंगी राजेंद्र इंगळे, अशोक इंगळे, सुरज भोरडे, प्रा.दर्शन चौधरी, युवराज इंगळे, संतोष इंगळे, जालिंदर इंगळे, दादासाहेब इंगळे, नरसिंग ढवळे, संदीप भोर, नितीन गावडे, दत्तात्रय इंगळे, प्रकाश इंगळे, विठ्ठल इंगळे, राहुल इंगळे, विजय लोखंडे, नितीन इंगळे, निखिल इंगळे, दत्तात्रय गावडे, सागर इंगळे, विजय ढवळे, सुनील इंगळे, निलेश इंगळे, आकाश इंगळे, शरद इंगळे, आदित्य इंगळे, महेश इंगळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page