- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणशिरूर हवेली मतदारसंघ काँग्रेसने लढविण्याची पदाधिकाऱ्यांची केंद्रीय निरीक्षकांकडे आग्रही मागणी

शिरूर हवेली मतदारसंघ काँग्रेसने लढविण्याची पदाधिकाऱ्यांची केंद्रीय निरीक्षकांकडे आग्रही मागणी

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक व तेलंगाना प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी कार्यकारी अध्यक्ष जेट्टी कुसुमा कुमार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी व शिरूर तालुका काँग्रेस कमिटी यांचा पदाधिकारी मेळावा शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला.
शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वैभव यादव यांनी पक्ष निरीक्षक जेट्टी कुसुमा कुमार यांचे स्वागत केले तसेच आपल्या प्रास्ताविकात श्री. यादव यांनी शिरूर हवेली मतदार संघ काँग्रेसकडे ठेवण्याची आग्रही मागणी केली. यादव पुढे म्हणाले की, आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते लोकसभेच्या निवडणुकीपुरते काँग्रेस कार्यकर्त्यांची मदत घेतात परंतु विधानसभेच्या वेळेला मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते. या गोष्टींचा विचार करून पक्षाने शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे ठेवण्याची आग्रही मागणी केली.
पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खजिनदार महेश अरविंद ढमढेरे यांनी आपले विचार मांडले. आपल्या भाषणात ढमढेरे यांनी तालुक्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. ते पुढे म्हणाले की मागील पंचवीस वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर असणाऱ्या आघाडीमुळे शिरूर हवेली तालुक्यात काँग्रेस पक्षाला निवडणूक लढवता आलेली नाही तसेच आजच्या स्थितीत विद्यमान लोकप्रतिनिधी विषयी मतदारसंघात प्रतिकूल वातावरण आहे. मतदारसंघातील प्रश्नांविषयी बोलताना श्री ढमढेरे म्हणाले की, शिरुर हवेली मतदार संघात शेतकऱ्यांचे अनेक मोठे प्रश्न आहेत. न्हावरे येथील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडलेल्या अवस्थेत असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस घालण्यासाठी हक्काचा कारखाना राहिलेला नाही. कारखान्याच्या तसेच कामगारांच्या प्रश्नावर मागील तीन वर्षांपासून ते स्वतः काँग्रेस पक्षाच्या वतीने सातत्याने आंदोलन व संघर्ष करत आहेत. त्याचबरोबर या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण झालेले असल्यामुळे कामगारांचे मजुरांचे गोरगरिबांच्या असंख्य प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बोलताना श्री ढमढेरे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत शिरूर हवेली मतदारसंघ महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाने स्वतःकडे घ्यावा. ढमढेरे पुढे म्हणाले की ढमढेरे कुटुंबीय मागील चार पिढ्यांपासून काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून काम करत आहोत. तरी या बाबींचा विचार करून पक्षाने पुढील निर्णय घ्यावा.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा श्री अरविंद ढमढेरे यांनी यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना श्री अरविंद ढमढेरे यांनी सांगितले की, विद्यमान लोक प्रतिनिधी विषयी जनतेच्या मनात रोष आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाचे तळागाळातील कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचा उमेदवार असावा याबाबत आग्रही आहेत. पुढे बोलताना श्री अरविंद ढमढेरे म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विद्यमान लोकप्रतिनिधीचे काम करणार नाही याची दखल पक्ष निरीक्षक व वरिष्ठांनी घ्यावी.
काँग्रेस पक्षाचे केंद्रीय निरीक्षक जेट्टी कुसुम कुमार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील तसेच पुणे जिल्हा व शिरूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात कुमार म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रांमुळे संपूर्ण देशात काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. महाराष्ट्राच्या शेजारी असणारे कर्नाटक तसेच तेलंगणा या दोन्ही राज्यात काँग्रेसचे सरकारी स्थापन झालेली आहेत. महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस पक्षाला लोकसभेमध्ये अतिशय चांगले यश मिळालेले आहे. कुमार पुढे म्हणाले की लोकसभेच्या यशाची पुनरावृत्ती विधानसभेला करायची असल्यास सर्व कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत जाऊन काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम पोहोचवला पाहिजे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील जागा वाटपाबाबत बोलताना श्री कुमार म्हणाले की या मतदारसंघात काँग्रेस पक्षाची स्थिती चांगली असून पक्षांतर्गत सर्वेंमधून त्याबाबत अनुकूल प्रतिक्रिया मिळत आहेत. श्री कुमार म्हणाले की शिरूर लोकसभा मतदारसंघात तील जास्तीत जास्त विधानसभा मतदारसंघाची मागणी काँग्रेस पक्ष करणार आहे. शिरूर हवेली मतदारसंघाबाबत कार्यकर्त्यांच्या भावनांचा योग्य विचार करून या भावना पक्षश्रेष्ठी पर्यंत पोहोचवण्याचे काम नक्कीच करणार असल्याचे प्रतिपादन श्री कुमार यांनी केले. यावेळी कुसुमा कुमार यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षातून असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
मांडवगण वडगाव-रासाई जिल्हा परिषद गटातून हरिभक्त परायण अण्णा महाराज फराटे, मांडवगण फराटा, निवृत्ती बाबुराव थोरात, माजी ग्रामपंचायत सदस्य वडगाव रासाई, दत्तात्रय घायतडक, अभिषेक महाराज गायकवाड, तेजस महाराज शेलार, साहेबराव शिंदे, बळी शिंदे, मच्छिंद्र चव्हाण, रामदास कुंभार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शिरसगाव फाटा या ठिकाणाहून पिंटू काका घाडगे, युवराज बबन चव्हाण, सागर शिवाजी खैरे, सोमनाथ गायकवाड, ऋषिकेश कदम, मयुरी युवराज चव्हाण, अखिल बन्सी, सय्यद, कार्तिक इंगळे, गणेश साठे, शुभम सोनवणे, शमशेर, विशाल ढवळे, यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सादलगाव या ठिकाणाहून मोहन जगताप, सलीम जगताप, भरत अडसूळ, दत्ता जगताप, सुपला भोसले, सावळा नाना, महेंद्र भालेराव, नितीन गायकवाड, प्रवीण जगताप, संभाजी जगताप, तुषार होळकर, गोकुळ पोळ, संतोष शेळके, किशोर जगताप, पवन जगताप, दिगंबर भगत, अनिल कांबळे, ताराबाई उदमले, रायबा होळकर, द्रौपताबाई कांबळे आदींनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यावेळी शिरूर तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबासाहेब गव्हाणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी शिरूर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी प्रियांका बंडगर (अध्यक्ष, शिरूर तालुका महिला काँग्रेस), किरण आंबेकर (अध्यक्ष, शिरूर शहर काँग्रेस), संतोष गव्हाणे (कार्याध्यक्ष, शिरुर तालुका काँग्रेस कमिटी) अमजद पठान (अध्यक्ष, शिरूर शहर युवक काँग्रेस), अनिल सातव (उपाध्यक्ष, शिरूर तालुका काँग्रेस), अमोल घूमे (अध्यक्ष, शिरूर तालुका ओबीसी काँग्रेस), रामदास थोरात (अध्यक्ष, शिरूर तालुका किसान काँग्रेस), रामदास धुमाळ (अध्यक्ष, मराठा समाज आघाड़ी काँग्रेस), अज़ीमभाई सय्यद (अध्यक्ष, अल्पसंख्याक काँग्रेस), निर्पेश पाठक (अध्यक्ष, शिरूर तालुका सोशल मीडिया), प्रदिप मेहकरे, सुनील गव्हाने, कय्यूम शेख़ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मयूर युवराज चव्हाण यांना विद्यार्थी काँग्रेस शिरूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सदर नियुक्तीपत्र श्री कुसुमा कुमार यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच वडगाव रासाई येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णा थोरात यांना सांस्कृतिक कला क्रीडा शिरूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली व त्यांना निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. सुजित शेलार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले युवक काँग्रेसचे अध्यक्ष संकेत गवारे यांनी आभार मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page