- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणअजितदादांचा आशीर्वाद मिळाल्यास शिरुर हवेलीचे प्रश्नांचा आवाज विधानसभेत बुलंद करू : चंदन...

अजितदादांचा आशीर्वाद मिळाल्यास शिरुर हवेलीचे प्रश्नांचा आवाज विधानसभेत बुलंद करू : चंदन सोंडेकर

- Advertisement -spot_img

मा. तालुकाध्यक्ष विठ्ठलराव ढेरंगे – आबासाहेब गव्हाणे यांच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया
शिरूर : प्रतिनीधी
एकीकडे बदललेली राजकीय समीकरणे त्यातच शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात अनेक दिग्गजांनी पक्षांतर केल्याने या विधानसभेत नक्की लढत कशी होईल याची उत्सुकता लागून राहिली असताना २०१९ मधील निवडणुकीत विद्यमान आमदार अशोक बापू पवार, माजी आमदार बाबूराव पाचर्णे व त्यांच्यानंतर तिसरा क्रमांकावर राहिलेले शिरूरच्या पश्चिम भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश प्रवक्ते तसेच अजितदादा पवार गटाचे नेते चंदन सोंडेकर यांनी यंदा मतदार संघातील गावोगावी जाऊन वैयक्तिक भेटी-गाठीवर भर दिल्याने ते या २०२४ च्या शिरूर विधानसभा निवडणुकीत ताकतीने उतरणार असल्याचे स्पष्ट केले.
शिरूर व हवेली तालुक्याचा विचार करता मागील निवडणुकीत केलेल्या मतदारा पेक्षा यंदाच्या मतदारात मोठी वाढ झाली असून युवा वर्ग मोठ्या संख्येने मतदान करणार आहेत. वैयक्तिक गाठीभेटी करत असताना चंदन सोंडेकर यांनी नुकतीच कोरेगाव भीमा येथे माजी सरपंच तसेच शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव ढेरंगे तसेच माजी सरपंच आबासाहेब लक्ष्मण गव्हाणे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एकीकडे पक्षांतर्गत सुरू असलेल्या राजकारणामुळे शिरूर हवेलीची जागा एकीकडे विद्यमान आमदार अशोक बापू पवार यांना शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे तिकीट जवळपास निश्चित आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजपा तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांच्या पैकी कोणाच्या पदरात तिकीट पडते याची उत्कंठा शिगेला पोचली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापने पासून असलेला राजकीय प्रवास तसेच युवकांबरोबर ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेत पक्षाने तिकीट दिले तर पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना चंदन सोंडेकर यांनी सांगितले. तसेच अजितदादांचा आशीर्वाद मिळाल्यास शिरुर हवेलीचे प्रश्नांचा आवाज विधानसभेत बुलंद करू असे चंदन सोंडेकर यांनी स्पष्ट केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page