- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीण४३६ रुपयांत काढलेल्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विम्याचा मिळाला; दोन लाखांचा लाभ

४३६ रुपयांत काढलेल्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विम्याचा मिळाला; दोन लाखांचा लाभ

- Advertisement -spot_img

लोणीकंद : प्रतिनीधी
केंद्र शासनाने प्रधानमंत्री जीवन ज्योती व सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे, काही दिवसापूर्वी ४३६ रुपयांत काढलेल्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विम्याचा दोन लाखांचा लाभ मुलाच्या मृत्यूनंतर त्याची वारसदार आईच्या थेट खात्यात जमा झाल्याचे फुलगाव ता. हवेली येथील रहिवासी आई मालन पांडुरंग कोळपकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


काही दिवसापूर्वी विनोद कोळपकर याचे आकस्मिक निधन झाले तो नोकरीस होता व त्याचे लोणीकंद येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत त्याचे बचत खाते होते. त्या कारणाने पीएफ संबंधी चौकशी करण्यासाठी त्याच्या आई मालन कोळपकर ह्या बँकेत चौकशी साठी गेल्या
असता. तेव्हा बँकेचे कर्मचारी तुषार काळे यांनी बचत खात्या विषय चौकशी केली. मयत विनोद कोळपकर याने ४३६ रुपयांत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा काढता असल्याचे समजले व ही बाब आई मालन कोळपकर यांच्या निदर्शनास आणून दिली.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

योग्य ती कागदपत्रांची पूर्तता करून महाराष्ट्र बँकेने मृत पावलेल्या विनोद कोळपकर याचे वारसदार आई मालन कोळपकर यांच्या बचत खात्यात दोन लाख रुपये थेट जमा करण्यात आले. त्यामुळे शाखा व्यवस्थापक उज्वल श्रीवास्तव, कर्मचारी तुषार काळे, बिनोदकुमार सिंग, सुनिल टिळेकर, राजेंद्र उणवणे, बीसी एजंट अजित कोहीनकर यांच्यासह कर्मचारी, बॅंक ऑफ महाराष्ट्राचे मालन कोळपकर यांनी आभार व्यक्त केले.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा ४३६ रुपयांत काढला जातो विमाधारक व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला तर वारसाला दोन लाख रुपयांचा लाभ होतो. या योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासले जात आहे. अद्यापही अनेकजण विमा काढण्याकडे कानाडोळा करताना दिसून येत आहेत : उज्वल श्रीवास्तव बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा व्यवस्थापक लोणीकंद

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page