पुणे जिल्हा प्रतिनिधी : रिजवान बागवान
संपुर्ण जगाला शांतीचा आणि एकतेचा संदेश देणारे मुस्लिम धर्मीयांचे धर्मगुरू, नबी,रसुल हजरत मुहम्मद पैगंबर सहाब यांची जयंती तसेच ईद ए मिलाद या सणा निमित्त सणसवाडी परिसरातील डोंगरवस्ती येथील नामांकित माहेर संस्थेत आश्रय घेत असलेल्या वंचित व गरजुंना सणसवाडी मुस्लिम जमातच्या वतीने मिठाई व फळांचे वाटप करण्यात आले.तसेच हजरत मुहम्मद पैगंबर सहाब यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी सर्व धर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी मुस्लिम विकास परिषदेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पञकार रिजवान बागवान,तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्याराम मोरे,मुस्लिम जमातचे सामाजिक कार्यकर्ते खान सहाब,कॉंग्रेस आय पक्षाचे वंचित मराठा आघाडीचे शिरूर तालुकाध्यक्ष रामदास धुमाळ,फुले,शाहु,आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते सुधाकर लोखंडे आदिंनी हजरत मुहम्मद पैगंबर सहाब यांच्या जिवनाविषयी सखोल माहिती देऊन मार्गदर्शन केले.

यावेळी सणसवाडी मुस्लिम जमातचे सामाजिक कार्यकर्ते पैलवान अफजलभाई आत्तार,माहेर संस्थेचे प्रभारी विजय तवर, नजीरभाई तांबोळी, मुनीरभाई आत्तार, बिलालभाई शेख, जुनेदभाई शेख, समीऊद्दीन शेख आदि सर्व धर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येंने उपस्थित होते. या प्रसंगी माहेर संस्थेच्या वतीने ईद ए मिलाद व हजरत मुहम्मद पैगंबर सहाब यांच्या जयंती निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.





