गजानन गव्हाणे पाटील
शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील भिमा नदीच्या पात्रात सार्वजनिक मंडळे, शाळा, कारखाने तसेच घरगुती अश्या तब्बल चार हजार पेक्षा जास्त गणेश मूर्तींचे मोठ्या उत्साहात आणि साश्रू नयनांनी भीमा नदीत विसर्जन करण्यात आले.
नदी चे पात्रात गणपती विसर्जन करताना कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामपंचायत च्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. यामध्ये नागरिकांना नदी पात्रात उतरून मूर्ती विसर्जन करण्यापेक्षा होडी च्या माध्यमातून विसर्जन करण्याचे आवाहन आदर्श सरपंच संदीप ढेरंगे यांच्या वतीने करण्यात आले होते. याला गणेश भक्तांनी देखील उस्फुर्त प्रतिसाद देत होडीतून जास्तीत जास्त प्रमाणत गणपती चे विसर्जन केले. याचे नियोजन ग्रामपंचायत चे कर्मचारी तसेच स्वप्नील भोकरे यांनी केले.

तसेच नदी पात्रात निर्माल्य जाऊन ती दूषित होऊ नये यासाठी ग्रामपंचायत चे वतीने निर्माल्य जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याच बरोबर नदी पात्रात रात्रीच्या वेळी विसर्जनासाठी येणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती साठी लाईट ची सोय करण्यात आली असल्याने अनेकांनी नियोजनाचे कौतुक केले.
तर या ठिकाणी नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये यासाठी पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





