- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगाव भीमा सोसायटीच्या चेअरमन पदी अशोक गव्हाणे तर चेअरमनपदी रामदास कांबळे बिनविरोध

कोरेगाव भीमा सोसायटीच्या चेअरमन पदी अशोक गव्हाणे तर चेअरमनपदी रामदास कांबळे बिनविरोध

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
विविध कार्यकारी विकास सोसायटी क्रमांक दोनच्या चेअरमनपदी कोरेगाव भिमा ग्रामपंचायत चे माजी सदस्य व शिरूर खरेदी – विक्री संघाचे माजी संचालक उद्योजक अशोक (काका) दत्तात्रय गव्हाणे पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.


विद्यमान चेअरमन अनिल गव्हाणे यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी विकास सोसायटीच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. तसेच सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदी रामदास गुलाब कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून डी. वाय. वराळ (सहकारी अधिकारी, शिरूर तालुका) संस्थेचे सचिव मधुकर कंद यांनी कामकाज पाहिले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यावेळी माजी सरपंच आबासाहेब लक्ष्मण गव्हाणे, माजी पोलीस पाटील विक्रम गव्हाणे, पंचायत समितीचे माजी सदस्य पी. के. आण्णा गव्हाणे, सरपंच संदीप ढेरंगे, बाळासाहेब फडतरे, विजय गव्हाणे, अशोक काशीद, वसंतराव गिलबिले, माजी चेअरमन बबुशा ढेरंगे, सुनील गव्हाणे, नागेश गव्हाणे, पंडित फडतरे, माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे, राजाराम ढेरंगे, गणेश गव्हाणे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे, कांद्याचे व्यापारी विजय गव्हाणे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष दिनकर गव्हाणे, ज्ञानेश्वर शिंदे, शिरूर तालुका रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष विक्रम दौंडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बापूसाहेब शिंदे, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे रवींद्र फडतरे, उद्योजक शरद गव्हाणे, विशाल कांबळे, माजी राष्ट्रवादीचे नेते नारायण फडतरे आदी मान्यवर, विकास सोसायटी चे सर्व आजी माजी संचालक, शेतकरी यावेळी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page