- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणवाढदिवसानिमित्त भावीमंत्री पदाच्या शुभेच्छांचा आमदार अशोक पवारांवर वर्षाव

वाढदिवसानिमित्त भावीमंत्री पदाच्या शुभेच्छांचा आमदार अशोक पवारांवर वर्षाव

- Advertisement -spot_img

वडगाव रासाई आमदार निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी शिरूर-हवेलीतील जनतेचा गर्दीचा उच्चांक
गजानन गव्हाणे पाटील
आमदार अशोक पवार यांची निष्ठा, कार्यतत्परता व जनसेवेशी जोडलेली नाळ, रचनात्मक विकासाचा उंचावणारा आलेख, कुटुंबासारखी काळजी घेणारे आमदार दाम्पत्य त्यामुळे यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार पवार विजयाचा गुलाल उधळणार असून त्यांना यावेळी मंत्रिपद मिळावे ही अपेक्षा व्यक्त करताना आमदार अशोक पवार यांच्यावर नागरिक, कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि निष्ठावान कार्यकर्ते, सहकरियांनी शुभेच्छापर अभिनंदनाचा वर्षाव केला.
यावेळी आमदार अशोक पवार यांच्या वडगाव रासाई येथील शेलारवाडीत निवासस्थानी शिरूर-हवेली तालुक्यातील जनतेने शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यामध्ये गर्दीचा उच्चांक पहायला मिळाला.

 

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

वडगाव रासाई, ता.शिरूर येथे आमदार ऍड. अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ व अधिक मोठा गुलाबांच्या फुलांचा आकर्षक हार, मंत्रालयाची प्रतिकृती, लालदिवा, अँबेसिडर पांढरी गाडी व आमदार अशोक पवार यांचा प्रतिकृती असलेला केक कापत आमदार अशोक पवार यांना शरद पवार यांच्याबद्दल निष्ठावान व प्रामाणिकपणाबद्दल भावीमंत्री पदाच्या शुभेच्छा अनेकांकडून देण्यात आल्या. यामध्ये शिरूर हवेली येथून हजारो कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक व अनेक नेते यांनी आमदार अशोक पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page