- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणशिरूर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्रा. मारुती दरेकर

शिरूर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्रा. मारुती दरेकर

- Advertisement -spot_img

शिरूर ता.माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडीची कार्यकारणी जाहीर ; शिक्षक आघाडीच्या अध्यक्ष पदी नागेश केदारी
गजानन गव्हाणे पाटील
शिरूर तालुक्यात शिक्रापूर येथील अजिंक्यतारा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिरूर तालुका माध्यमिक शिक्षक संघ व शिरूर तालुका शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या वतीने सहविचार सभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष केरुभाऊ ढोमसे तर निवडणूक निरीक्षक म्हणून पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव पंकज घोलप हे होते.


तर याप्रसंगी स्वामी विवेकानंद संस्थेचे आजीव सदस्य प्रा. अनिल साकोरे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ भंडारे, शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, राज्य कार्यकारिणी सदस्य धर्मेंद्र देशमुख, शिक्षक लोकशाही आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक दरेकर, शिरूर-हवेली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रवीणकुमार जगताप, नितीन माने, सेवानिवृत्त प्राचार्य इस्माईल सय्यद, हनीफ मुजावर, गणेश मांढरे, प्रा.संतोष मासळकर, उपप्राचार्य तुषार रुके, नवनाथ धुमाळ, शरद दुर्गे यांसह आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.


यावेळी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत शिक्षकांच्या समस्या व प्रश्न जाणून घेत महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष गोरखनाथ थोरात व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये माध्यमिक शिक्षक संघाच्या शिरूर तालुकाध्यक्ष पदी प्रा. मारुती दरेकर तर लोकशाही शिक्षक आघाडीच्या शिरूर तालुकाध्यक्ष पदी नागेश केदारी यांची निवड पार पडली.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

शिरूर तालुका माध्यमिक शिक्षक संघ कार्यकारिणी
मारूती दरेकर (अध्यक्ष), जालिंदर आखाडे (सचिव), तुषार विलास रुके (कार्याध्यक्ष), आदेश गारगोटे, एकनाथ विष्णु शिवेकर व प्रशांत साकोरे (उपाध्यक्ष), गोपीनाथ शेटे (सहसचिव), रोहिदास लवांडे व अरविंद गोळे
शिरूर तालुका शिक्षक लोकशाही आघाडी कार्यकारणी
नागेश केदारी (अध्यक्ष), प्रकाश चव्हाण (सचिव), संतोष नन्हे (कार्याध्यक्ष), नितिन गरुड, अर्जुन आढाव व साहेबराव हरभरे (उपाध्यक्ष), हनुमान नामदेव तुपेरे (सहकार्यवाह), संतोष खताळ (संघटक), अशोक गाडीलकर (कोषाध्यक्ष)

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page