
कोरेगाव भीमा : प्रतिनिधी सुनील भंडारे पाटील
डिंग्रजवाडी ता. शिरूर येथील भैरवनाथ महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भैरवनाथ यात्रेनिमित्त नाथांची महापूजा, सायंकाळी पालखी व काठीची मिरवणूक काढण्यात आली. यंदा पहिल्यांदाच फुलांच्या आकर्षक सजावटी सह मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिरांना एक वेगळेच रूप आले होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी ” चैत्रालीराजे चा नाद नाय करायचा ” हा ऑर्केस्ट्रा तर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळाने ग्रामस्थ व पाहुण्यांची करमणूक केली.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आयोजित केलेल्या कुस्तीच्या आखाड्याचे पूजन यात्रा कमिटी सदस्य संभाजी पाटीलबुवा गव्हाणे, अशोक रामचंद्र गव्हाणे, पंडित केशव फडतरे, गोरख लहानबा गव्हाणे, नारायण दादाभाऊ गव्हाणे यांच्या शुभहस्ते पार पडले. तर दैदिप्यमान कुस्त्यांसोबत च शेवटची मानाची कुस्ती पै. ऋषिकेश गव्हाणे – पै.पार्थ कंधारे आणि पै.अविनाश गव्हाणे – पै.अक्षय दरेकर यांच्यात झाली. यावेळी मानाची कुस्ती लावण्यासाठी सरपंच यशवंत आबासाहेब गव्हाणे, भाऊसाहेब बाप्पुराव गव्हाणे, मल्हारी मुकिंदा गव्हाणे, माजी उपसरपंच बाप्पुसाहेब मल्हारी गव्हाणे, नरहरी रामभाऊ गव्हाणे, संचालक अनिल एकनाथ गव्हाणे, प्रवीण बाबुराव गव्हाणे, अशोक देवचंद नाबगे ग्रामपंचायत सदस्य प्रसाद शांताराम गव्हाणे, सागर शिवाजी गव्हाणे सणसवाडी चे माजी उपसरपंच बाबासाहेब दरेकर आदी मान्यवर आखाड्यात उपस्थित होते. यावेळी आखाड्या मध्ये पंच म्हणून पुणे जिल्हा केसरी पै. बालाजी गव्हाणे, शिरूर केसरी पै. अविनाश गव्हाणे, पै. आकाश नाबगे, पै.दशरथ हिरामण गव्हाणे, पै. भानुदास नाबगे, पै. मधुआण्णा गव्हाणे, पै. छबूकाका गव्हाणे यांनी नियोजन पाहिले तर सूत्रसंचालन माजी उपसरपंच संदीप माणिक गव्हाणे व दत्तात्रय भाऊसाहेब गव्हाणे यांनी केले.
गावागावातील मातीच्या आखाड्या मधून च पैलवान तयार होत असतात. यात्रा जत्रांमधिल कुस्तीच्या आखाड्यामुळे नवीन पैलवानांना आपले कौशल्य दाखवण्यास संधी मिळत असते यातून च महाराष्ट्र केसरी सारखे मल्ल तयार होण्यास चालना मिळते. यंदा डींग्रजवाडी च्या आखाड्यात नामांकित तालमीच्या मल्लांनी सहभाग घेऊन दैदिप्यमान निकाली कुस्त्या केल्याने पुढच्या वर्षी यात्रेला नामांकित पैलवानांना निमंत्रित करून निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्याचा प्रयत्न करू.
पै.बालाजी भाऊसो. गव्हाणे (शिरूर केसरी, पुणे जिल्हा केसरी)
मागील दोन वर्षे कोरोना मुळे यात्रा करता आली नाही.मात्र यंदा ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई सह, ऑर्केस्ट्रा, तमाशा व कुस्तीच्या आखाड्याच यशस्वी नियोजन करता आलं. यंदा सर्व कार्यक्रम निर्विघ्न पने कुठल्याही प्रकारचे गालबोट न लावता पार पाडल्याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीने ग्रामस्थांना व तरुणांना यात्रा कमिटी च्या वतीने धन्यवाद..
संभाजी पाटील बुवा गव्हाणे (यात्रा कमिटी सदस्य)





