- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणरन फॉर वाघोली' मॅरेथॉनचे आयोजन

रन फॉर वाघोली’ मॅरेथॉनचे आयोजन

- Advertisement -spot_img

मॅरेथॉनद्वारे वाघोलीतील समस्यांवर लक्ष वेधणार
गजानन गव्हाणे पाटील
वाघोली येथील पाणी, वाहतूक कोंडी, सांडपाणी आणि मालमत्ता कर या समस्यांवरील उपाययोजनेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रावलक्ष्मी फाऊंडेशनच्या वतीने ‘रन फॉर वाघोली’ मॅरेथॉनचे आयोजन २५ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन सकाळी ६ वाजता वाघेश्वर मंदिराजवळील अभिषेक लॉन्स येथून सुरू होणार असून पुणे नगर रोड मार्गे लेक्सिकॉन शाळेच्या समोर दत्तकृपा पार्किंग पर्यंत होणार आहे.


यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार , सुजाता पवार आदिंसह वाघोली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


मॅरेथॉनमध्ये वयानुसार चार गटांमध्ये नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे : युवक गट (१४ ते १८ वर्षे), तरुण गट (१८ ते २४ वर्षे), प्रौढ गट (२५ ते ४४ वर्षे), आणि ज्येष्ठ गट (४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे). प्रत्येक सहभागीला ई-प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देण्यात येणार आहे, तसेच प्रत्येक गटातील तीन महिला आणि तीन पुरुष विजेत्यांना सन्मानचिन्ह (ट्रॉफी) प्रदान केले जाईल.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

वाघोलीतून करोडो रुपया महानगरपालिका सोयीसुविधा व्यवस्थित देत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असते याचा निषेध म्हणून सहभागी वाघोलीकरांनी आपल्या हक्कांसाठी सर्वांनी येताना एक रुपया सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एक एक रुपयांची जमा झालेली रक्कम महापालिकेला भेट दिली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले असून यामुळे महापालिकेच्या वतीने नागरिकांना पुरेशा सोयीसुविधा पुरवाव्यात असा संदेश या मॅरेथॉनद्वारे दिला जात आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page