गजानन गव्हाणे पाटील
बदलापूर येथे झालेली घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी असून अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा होणे गरजेचे असून कलकत्ता येथील निवासी डॉक्टर असो वां बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर झालेला अत्याचार हा समस्त महिलांसाठी एक शोकांतिका असून नुसते मोर्चे काढण्यापेक्षा महिलांच्या छेडखानी अत्याचार विरोधात कडक कायद्यांची लवकरात लवकर अंमलबजावणी केली पाहिजे असे मत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा युवती उपाध्यक्ष तसेच युवा स्पंदन सोशल फाउंडेशन शिरूरच्या अध्यक्षा प्रियंका अशोक धोत्रे यांनी केली आहे.
सध्या महिला सुरक्षितेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी बलात्कार करणाऱ्या नरधामांवर तातडीने कारवाई केली पाहिजे. इतर देशांमध्ये बलात्काराविषयी जसे कडक नियम आहे. तसेच कडक नियम आपल्या भारतात आले तर भारतातील स्त्रियांवर, लहान मुलींवर तसेच वयोवृद्ध महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर कुठेतरी नियंत्रण मिळेल.

तसेच अश्या आरोपींवर कोर्टात केस किती दिवस ठेवणार त्याचा निकाल लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात लावावेत अशी मागणी शिरूर येथे बदलापूर व कोलकत्ता येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात प्रियांका धोत्रे यांनी केली.





