थेऊर येथील चिंतामणी मंदिर परिसरात निवडीचे पत्र प्रदान
थेऊर : विशेष प्रतिनिधी
राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश या पत्रकार संघटनेच्या पुणे जिल्हा वरिष्ठ कार्याध्यक्षपदी लोकमतचे पत्रकार हभप. प्रा. सचिन माथेफोड महाराज यांची निवड संघटनेचे संस्थापक/केंद्रीय अध्यक्ष मधुसुदन कुलथे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

यावेळी थेऊर चिंतामणी मंदिरात प्रथम हभप. प्रा. सचिन माथेफोड यांच्या हस्ते तर उपस्थित सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते चिंतामणी गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पच्छिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयराव लोखंडे,पुणे विभागीय अध्यक्ष नितीन करडे आदींच्या हस्ते हभप. प्रा.सचिन माथेफोड यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी पुणे जिल्हा वरिष्ठ कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हभप. प्रा. सचिन माथेफोड यांचा सत्कार दैनिक प्रभातचे पत्रकार सचिन सुंबे, दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार चंद्रकांत दुंडे, मराठा महासंघाचे भाऊसाहेब जगताप, संघटनेचे पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष विजयराव लोखंडे,पुणे विभागीय अध्यक्ष नितीन करडे आदींच्या हस्ते पार पडला.

समाजामध्ये काम करत असताना पत्रकारांना अनेक अडचणी येतात. अशा अडचणींमध्ये पत्रकारांना मदत करणे गरजेचे असते तसेच पत्रकारांना संरक्षण कवच देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत. जिल्ह्यातील पत्रकारांना शासकीय सेवा, सुविधा, योजनांचा लाभ मिळवून देण्याचा कायम माझा प्रयत्न राहील. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये राज्य मराठी पत्रकार परिषदेची ताकद, सर्वांच्या सहकार्याने संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिवार्चित पुणे जिल्हा वरिष्ठ कार्याध्यक्ष हभप. प्रा.सचिन माथेफोड महाराज यांनी यावेळी बोलताता सांगितले.

संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे, महासचिव पवन बैस, संचालक नगरे तसेच जिल्ह्यातील अनेक पत्रकारांनी माथेफोड यांचे निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.





